शिरपूर जैन येथे शेतकरी घेतात हळदीचे विक्रमी पीक !

By Admin | Updated: March 17, 2016 02:22 IST2016-03-17T02:22:10+5:302016-03-17T02:22:10+5:30

हळदच्या पिकाकडे शेतक-यांचा ओढा.

Shrir Jain takes a farmer's hottish peak! | शिरपूर जैन येथे शेतकरी घेतात हळदीचे विक्रमी पीक !

शिरपूर जैन येथे शेतकरी घेतात हळदीचे विक्रमी पीक !

शंकर वाघ /शिरपूर जैन (जि. वाशिम)
गत काही वर्षांंपासून येथील शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देऊन हळदीचे उत्पादन घेत आहेत. त्यांना लाखो रुपयांचे उत्पादन होत असल्याने दिवसेंदिवस हळदीच्या शेतीत वाढ होत आहे.
पूर्वी गावातील सर्वच शेतकरी कपाशी, गहू, हरभरा आदी पीक घेत होते. त्यानंतर सोयाबिनच्या शेतीकडे वळले. चार ते पाच वर्षांंंंपूर्वी गावात कपाशी व सोयाबिन ही मुख्य पिके होते. आता मात्र यामध्ये बदल झाला असून, गत काही वर्षांपासून शेतकरी हळदीच्या पिकाकडे वळले आहेत. सुरुवातीला गावातील काही शेतकर्‍यांनी हळदीचे पीक घेतले. त्यांना नफा झाल्यामुळे त्यानंतर अनेक शेतकरी याकडे वळले. आता गावातील १00 ते २00 शेतकरी हळदीचे पीक घेत आहे. त्यांना एका एकरात लाखोंचे उत्पादन होत आहे.
नंदकिशोर उल्हामाले, आशीष देशमुख, गजानन गाभणे, बाळासाहेब देशमुख, ज्ञानेश्‍वर गावंडे, नीलेश शर्मा, संजय कान्हेड, डॉ. गजानन ढवळे यांच्यासारख्या युवा शेतकर्‍यांनी मागील काही वर्षांंंंंपासून हळद पिकाचे विक्रमी उत्पादन घेऊन इतर शेतकर्‍यांना हळदीचे पिके घेण्यासाठी प्रवृत्त केले. एकरी २५ ते ३0 क्विंटल हळदीचे उत्पन्न होत असल्याने एकरी उत्पन्नही २.५0 लाख ते तीन लाखापर्यंंंंंत होत आहे. हळदीच्या पिकासाठी सिंचन फार महत्त्वाचे असून, त्यासाठी ही मंडळी ठिबक सिंचनाचा अवलंब करून प्रगती साधत आहे. हळदी पिकामुळे शिरपूरच्या काही शेतकर्‍यांचे जीवनच बदलले असून, डॉ. ढवळे, इंजि. नंदकिशोर उल्हामाले, गजानन गाभणे, अरुण बोबडे यांनी आपले व्यवसाय सोडून चक्क शेतीतच करिअर घडविले आहे.

*अभियंता झाला शेतकरी
इंजिनिअर नंदकिशोर उलेमाले बी.ई. मेकॅनिकल असून, नोकरी न करता त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. नोकरी न करता शेतीकडे वळण्याबाबत मत व्यक्त करताना त्यांनी सांगितले, की शेतकरीसुद्धा प्रतिष्ठेचे जीवन जगू शकतो, हे मी दाखवून दिले. या वर्षी माझे २ एकर हळद पीक आहे. २ एकर डाळिंब आहे. १ एकर कांदा बीजोत्पादन आहे. २ एकर वांगे आहे व इतर सोयाबिन, तूर व हरभरा होत. ९ एकरातील २ एकर डाळिंब वजा जाता ७ एकर मध्ये मला यावर्षी जवळपास १२ लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. हळदीमुळेच माझी आर्थिक परिस्थिती सुधारली व मी आजरोजी जवळपास १ लाख रुपये महिना कमवत आहे.

Web Title: Shrir Jain takes a farmer's hottish peak!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.