आंतरराष्ट्रीय लंगडी स्पर्धेत श्रेया व मृदुलाला सुवर्णपदक
By Admin | Updated: July 31, 2015 22:52 IST2015-07-31T22:52:45+5:302015-07-31T22:52:45+5:30
राष्ट्रीय लंगडी स्पर्धेत रजत पदक पटकवून त्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत लागली होती वर्णी.

आंतरराष्ट्रीय लंगडी स्पर्धेत श्रेया व मृदुलाला सुवर्णपदक
जळगाव जामोद (जि. बुलडाणा): स्थानिक स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठातील विद्यार्थींंनी श्रेया राठी आणि मृदुला पाटील यांनी बँकाक येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय लंगडी स्पर्धेतमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देवून देशासह जळागाव जामोद तालुक्याची मान उंचावली आहे. २४ ते २७ जुलै दरम्यान बँकाक (थायलंड) येथे आंतरराष्ट्रीय लंगडी स्पर्धा संपन्न झाल्या. यास्पर्धेमध्ये मृदुला आणि श्रेयासह राज्यातून चार जणींनी सहभाग नोंदवला. २0१४ मध्ये झालेल्या मणीपूर येथील राष्ट्रीय लंगडी स्पर्धेत त्यांनी रजत पदक पटकवून त्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वर्णी लागली होती.