‘श्रीं’ची पालखी जिल्ह्यात दाखल!

By Admin | Updated: June 1, 2017 01:28 IST2017-06-01T01:28:14+5:302017-06-01T01:28:14+5:30

अकोला: विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या शेगाव नगरीचे संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे जिल्ह्यात आगमन झाले असून शुक्रवार २ जून रोजी २ दिवसांच्या मुक्कामाकरिता अकोला नगरीत आगमण होत आहे.

'Shree' in Palkhi district! | ‘श्रीं’ची पालखी जिल्ह्यात दाखल!

‘श्रीं’ची पालखी जिल्ह्यात दाखल!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या शेगाव नगरीचे संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे जिल्ह्यात आगमन झाले असून शुक्रवार २ जून रोजी २ दिवसांच्या मुक्कामाकरिता अकोला नगरीत आगमण होत आहे. गत ४१ वर्षापासून येथील श्री गजानन महाराज शेगाव पालखी उत्सव समितीच्या वतीने या पालखीचे स्वागत व नगरवासीयांना शिस्तद्धपणे व शांततेत दर्शन घडवून देण्याची किमया यशस्वीपणे पार पाडीत आहे. हे सर्वांना माहितीच आहे.
यावर्षीही ही परंपरा पुढे नेत श्रींच्या पालखीचे स्वागत अधिक जोमात व हर्षोल्हासात व्हावे म्हणून समितीच्या वतीने जय्यत तयारी सुरू केली आहे. २ जून रोजी सकाळी श्रींची पालखी महानगरात दाखल होत असून, जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात पालखीच्या पहिल्या दिवसाचा सकाळी तात्पुरता मुक्काम राहील. जेथे पालखीसह आलेल्या वारकऱ्यांची चहा-फराळाची व्यवस्था करण्यात येईल.
तसेच श्रींच्या भक्तांना दर्शनाकरिता ही पालखी सकाळी ९ वाजेपर्यंत उपलब्ध राहील. तेथून पालखी पुढील मार्गक्रमणाकरिता निघेल.
गोडबोले प्लॉट, डाबकी रोड मार्गे, संत ज्ञानेश्वर मंदिर, कस्तुरबा हॉस्पिटलच्या मागून, शिवचरण मंदिर मार्गे, विठ्ठल मंदिर काळा मारोती रोड, लोखंडी पुलावरून, टिळक रोड, अकोट स्टॅन्ड, दीपक चौक, कलालच्या चाळीसमोरून, जुना वाशिम स्टॅन्ड, चांदेकर चौक मार्ग, पंचायत समिती रोड, कालंका माता बाजोरिया विद्यालय येथे मुक्काम राहील. येथे भक्तांना रात्री सहपरिवार दर्शनाचा व शेगावचा धर्तीवर प्रसादाचा लाभ घेता येईल. नंतर, भजन, कीर्तन व श्री गजानन महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येथे दाखविण्यात येईल.

Web Title: 'Shree' in Palkhi district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.