बस स्थानकावर तोडफोड

By Admin | Updated: September 10, 2015 02:18 IST2015-09-10T02:18:06+5:302015-09-10T02:18:06+5:30

युवकास पैसे मागितल्यामुळे उपाहारगृहातील साहित्याची केली तोडफोड.

Shot at the bus station | बस स्थानकावर तोडफोड

बस स्थानकावर तोडफोड

अकोला - मध्यवर्ती बसस्थानकावरील उपाहारगृहात नास्ता करणार्‍या एका युवकाने पैसे मागितल्यामुळे उपाहारगृहातील साहित्याची तोडफोड केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. मध्यवर्ती बसस्थानकावर अखिलेश पारिका यांचे उपाहारगृह असून, येथे याच परिसरातील एका वसाहतमधील आशिष नामक युवक फुकटचे खातो. त्याला रोखल्यानंतर या युवकाने पारिका यांच्याशी वाद घालून उपाहारगृहातील साहित्याची तोडफोड केल्याचे प्रकार दोन ते तीन वेळा घडले आहेत. मात्र, पारिका यांनी याकडे दुर्लक्ष केले. बुधवारी रात्री हा युवक उपाहारगृहात आला व पाण्याची बाटली घेऊन निघून जाण्याच्या प्रयत्नात असताना पारिका यांनी त्याला अडवून पाणी बाटलीचे पैसे मागितले. त्यामुळे या युवकाने काही जणांना बोलावून उपाहारगृहातील साहित्याची तोडफोड केली. या प्रकरणाची तक्रार रात्री उशिरा सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात केली .

Web Title: Shot at the bus station