पश्चिम व-हाडात बंदला अल्प प्रतिसाद
By Admin | Updated: February 23, 2015 02:06 IST2015-02-23T01:46:08+5:302015-02-23T02:06:24+5:30
ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने राज्यव्यापी बंद.

पश्चिम व-हाडात बंदला अल्प प्रतिसाद
अकोला: ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने रविवारी पुकारलेल्या बंदला पश्चिम वर्हाडात अल्प प्रतिसाद मिळाला.
कोल्हापूर येथे १६ फेब्रुवारी रोजी अज्ञात हल्लेखोरांनी कॉ. पानसरेंची हत्या केली होती. या हत्येच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाने रविवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदला अकोला, बुलडाणा व वाशिम येथे अल्प प्रतिसाद मिळाला. बुलडाणा येथे बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही. अकोला येथे डाबकी रोड, जयहिंद चौक, जठारपेठ, गोरक्षण रोडवरील दुकानदारांनी बंद पाळला. वाशिम येथेही मुख्य बाजारपेठेतील काही प्रतिष्ठाने बंद होती.