शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! अंगणवाडीतील बालकांना मुदतबाह्य पोषण आहाराचे वाटप, पालकांनी केली तक्रार, मूर्तिजापूर येथील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 18:58 IST

एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडीत धडे घेणाऱ्या बालकांना कालबाह्य पोषण आहाचे वाटप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यात असे प्रकार वारंवार घडत असल्याने हा चिंतेचा विषय झाला आहे.

-संजय उमकअकोला -  एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडीत धडे घेणाऱ्या बालकांना कालबाह्य पोषण आहाचे वाटप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यात असे प्रकार वारंवार घडत असल्याने हा चिंतेचा विषय झाला आहे.

ग्रामीण व शहरी भागातील  प्रत्येक बालक सुदृढ व सक्षम व्हावा आणि त्याचे आरोग्य सुधारावे, यासाठी शासन अंगणवाडीच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात खर्च करते; पण मूर्तिजापूर तालुक्यातील परिस्थिती काही वेगळेच सांगून जाते. सक्षम व सुदृढ बनवणारी यंत्रणाच आता झाल्या प्रकारावरुन लक्षात येते. राज्य भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत मूर्तिजापूर येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प  कार्यालयाच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालकांना पोषण आहाराचे वाटप करण्यात येते परंतु मूर्तिजापूर शहरातील वसंत नगर स्थित अंगणवाडी क्रमांक ६ मधिल बालकांना मुदत बाह्य पोषण आहाराचे वितरण करण्यात आले. सीलबंद पाकीटात असलेल्या पोषण आहाराचे वितरण बालकांना करण्यात आले आहे. सदर पाकिटावर पॅकेजिंग तारीख ९ सप्टेंबर २०२१ असून पॅक केल्याच्या तारखेपासून ४ चार महीने पर्यंत वापरण्याची सुचना ठळक व स्पष्ट लिहिलेली असताना देखील या अंगणवाडीतून २४ मार्च रोजी मुदत संपलेल्या पोषण आहाराचे वितरण करण्यात आल्याचे समोर आले आहे. या संदर्भात सविश रविंद्र गवई यांनी चौकशी करुन कारवाई करण्यासाठी महिला व बालविकास आयुक्त व एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी मूर्तिजापूर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. वितरीत करण्यात आलेला आहारचे अनेक बालकांनी सेवन केले आहे. केवळ काही जागृक पालकांच्या घडलेला प्रकार लक्षात आला, ज्या बालकांनी आहाराचे सेवन केले अशा बालकांच्या प्रकृतीचे काय असाही प्रश्न निर्माण झाला आहे.  तालुक्यातील १९० अंगणवाड्या आहेत परंतु हा प्रकल्प चालविण्यासाठी कर्मचारी संख्या अत्यंत तोकडी आहे.  या कार्यालयाला एकूण १० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे; मात्र १० कर्मचाऱ्यांचा भार केवळ ४ ते ५ कर्मचारी सांभाळत आहेत. अतिरिक्त भार सांभाळताना अशा अनेक अक्षम्य चुका होत आहेत.  मुदत बाह्य पोषण आहाराचे आहाराचे वाटप करण्यात आले आहे, हे खरे आहे, सदर प्रकार अंगणवाडी सेविकेच्या चुकीने घडला. वितरीत करण्यात आलेल्या आहाराचे पॅकेट्स परत मागविण्यात आले आहे. - पी. के. राठोड, बालविकास प्रकल्प अधिकारी, मूर्तिजापूर

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्यMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार