धक्कादायक : पेट्रोल ओतून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 10:14 AM2020-07-27T10:14:37+5:302020-07-27T10:16:32+5:30

शालिनी पवित्रकार यांच्या घरात घुसून पेट्रोल अंगावर टाकले व गोपाळ डाबेराव याने शालिनिला जिवंत जाळण्याच्या उद्देशाने आगपेटीची काडी पेटवून अंगावर टाकली.

Shocking: Attempt to burn woman alive by pouring petrol! | धक्कादायक : पेट्रोल ओतून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्न!

धक्कादायक : पेट्रोल ओतून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्न!

Next
ठळक मुद्देया घटनेत महिला १५ टक्के भाजल्याने जखमी झाली आहे.कचरा टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव मंजू : कट्यार येथील क्षुल्लक कारणावरून एका ३५ वर्षीय महिलेच्या अंगावर शनिवारी रात्री पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत महिला १५ टक्के भाजल्याने जखमी झाली आहे. या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेतील तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कट्यार येथील शालिनी पवित्रकार (३५) व गोपाळ डाबेराव याची पत्नी या दोन महिलांचे कचरा टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपी गोपाळ डाबेराव, विठ्ठल डाबेराव, भास्कर डाबेराव या तिघांनी संगनमत करून शालिनी पवित्रकार यांच्या घरात घुसून पेट्रोल अंगावर टाकले व गोपाळ डाबेराव याने शालिनिला जिवंत जाळण्याच्या उद्देशाने आगपेटीची काडी पेटवून अंगावर टाकली.
दरम्यान, हा प्रकार शेजाऱ्यांना समजताच शेजाऱ्यांनी धाव घेऊन शालिनीच्या अंगावर पाणी टाकून आग विझविली व भाजलेल्या शालिनीला जिल्हा सामान्य रुग्णालय, अकोला येथे उपचारासाठी दाखल केले.
या घटनेत शालिनी १५ टक्के भाजली आहे. तिचा महिला अधिकाºयामार्फत व वैद्यकीय अधिकाºयाच्या समक्ष जबाब नोंदविण्यात आला. या प्रकरणात पो.हे.कॉ. सतीश सपकाळ यांच्या फिर्यादीवरून गोपाळ डाबेराव, विठ्ठल डाबेराव, भास्कर डाबेराव या तीन जणांविरुद्ध २६ जुलै रोजी कलम ४५२, ३०७, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करून अटक केली. दरम्यान, घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, ठाणेदार हरीश गवळी यांनी भेट दिली.

 

Web Title: Shocking: Attempt to burn woman alive by pouring petrol!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.