शॉक लागून शेतमजुराचा मृत्यू
By Admin | Updated: May 12, 2017 19:34 IST2017-05-12T19:34:17+5:302017-05-12T19:34:17+5:30
टिनाला स्पर्श झाल्याने त्यांना जबर शॉक लागला.

शॉक लागून शेतमजुराचा मृत्यू
व्याळा : येथील ५0 वर्षीय शेतमजूर शिवसिंग श्रीराम झाकर्डे घरकुलाचे काम करीत असताना गुरुवारी रात्री ११ वाजता वीज प्रवाह आल्याने त्यांना जबर शॉक लागला. यामध्ये त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यांच्या मागे चार मुली, दोन मुले व पत्नी असा आप्त परिवार असून, हलाखीची परिस्थिती आहे. नुकतेच घरकुलाचे काम त्यांनी सुरू केले. याचेच काम सुरू असताना लोंबकळणार्या तारांचा टिनाला स्पर्श होऊन त्यामध्ये वीज प्रवाह आला. या टिनाला स्पर्श झाल्याने त्यांना जबर शॉक लागला. यामध्ये ते घटनास्थळीच गतप्राण झाले. हलाखीच्या परिस्थितीत छत्र हरविल्याने त्यांच्या कुटुंबावर आभाळच कोसळले आहे. त्यांना शासन स्तरावरून मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. शक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)