आकोटमध्ये शिवसेनेला खिंडार
By Admin | Updated: October 8, 2014 00:54 IST2014-10-08T00:54:17+5:302014-10-08T00:54:17+5:30
माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे यांचा भाजपमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय.

आकोटमध्ये शिवसेनेला खिंडार
अकोला - जिल्ह्यात सर्वच पक्षांना गळती लागली आहे. यात आता शिवसेनेची भर पडली आहे. आकोटमध्ये शिवसेनाला खिंडार पडले असून, माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे यांनी बुधवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेच्या स्थापनेपासून २८ वर्षे पक्षासोबत असलेले चौखंड यांनी पक्षाला ह्यजय महाराष्ट्रह्ण करण्याचा निर्णय घे तला आहे. पक्षश्रेष्ठींच्या धोरणाला कंटाळून शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे चौखंडे यांनी सांगितले.