शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

कृषीविद्यापीठात ५ नोव्हेंबरपासून तीन दिवस शिवारफेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 12:32 IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ५ ते ७ नोव्हेंबरपर्यंत शिवारफेरीचे आयोजन केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विकसित नवे संशोधन, कृषी तंत्रज्ञान बघून या तंत्रज्ञानाचा शेतावर अवलंब करू न कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घ्यावे, यासाठीची परिपूर्ण माहिती देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ५ ते ७ नोव्हेंबरपर्यंत शिवारफेरीचे आयोजन केले आहे.विस्तार शिक्षण संचालनालयाद्वारे आयोजित शिवारफेरीचे उद्घाटन मंगळवार, ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता शेतकरी सदन येथे होईल. तीन दिवसीय शिवारफेरीत प्रत्यक्ष शेतशिवार बघण्याचा कार्यक्रम असून, दुपारी ४ ते ५ वाजतापर्यंत डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात चर्चासत्र होणार आहे. या चर्चासत्रात शेतकऱ्यांच्या शेती, संशोधन व तंत्रज्ञानासंदर्भातील शंकांचे निरसन केले जाणार आहे. ५ नोव्हेंबर रोजी अकोला, बुलडाणा, वाशिम व अमरावती या चार जिल्ह्यांतील शेतकरी शिवारफेरीत सहभागी होणार असून, ६ नोव्हेंबर रोजी चंद्रपूर, नागपूर, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. ७ नोव्हेंबर रोजी यवतमाळ, वर्धा व गडचिरोली जिल्ह्यांतील शेतकरी सहभागी होणार आहेत. तसे नियोजन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केले आहे. शेतकºयांना पूर्वसूचना देण्यासाठी १८००२३३०७२४ या क्रमांकवर नि:शुल्क संपर्क साधता येणार आहे.यावर्षी शेतकºयांना सेंद्रिय शेतीसंदर्भात माहिती देण्यात येणार आहे. तसेच उद्यान विद्या, कापूस संशोधन केंद्र, संशोधन प्रकल्प (फळे), ज्वारी संशोधन, कोरडवाहू शेती संशोधन, कडधान्य, तेलबिया संशोधन केंद्र, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय येथे अवजारे प्रदर्शन, नागार्जुन वनौषधी उद्यान व दुग्धशास्त्र विभाग येथील देशी गायी प्रकल्पांना भेटी देता येणार आहेत.डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती केंद्र भेटी देऊन डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे जीवनचरित्र बघता येणार आहे. शेतकºयांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी कृषी विद्यापीठाचे नियोजन केले असून, विदर्भातील हजारो शेतकरी या शिवारफेरीत सहभागी होणार असल्याची माहिती विस्तार शिक्षण संचालक डॉ. दिलीप मानकर यांनी दिली.

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ