शिवसेनेच्या तिकिटासाठी महाराजांचा वशिला

By Admin | Updated: September 5, 2014 01:20 IST2014-09-05T01:20:11+5:302014-09-05T01:20:11+5:30

अकोला पूर्व मतदारसंघातील इच्छुकांमधून एकाने चक्क इंदूर येथील महाराजांचा वशिला वापरल्याची माहिती.

Shivaji's Vaishila for Shiv Sena's ticket | शिवसेनेच्या तिकिटासाठी महाराजांचा वशिला

शिवसेनेच्या तिकिटासाठी महाराजांचा वशिला

आशिष गावंडे /अकोला
राजकारणात कधी काय होईल, याचा नेम नसतो. राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी राजकारणी कोणताही मार्ग निवडू शकतात. असाच अचंबित करणारा प्रकार अकोला पूर्व मतदारसंघातील इच्छुकांमधून समोर आला आहे. शिवसेनेचे तिकीट मिळावे, याकरिता ह्यमातोश्रीह्णवर बोलाविलेल्या यादीत नावाचा समावेश करण्यासाठी एका इच्छुकाने चक्क इंदूर येथील महाराजांचा वशिला वापरल्याची माहिती समोर आली आहे.
विधानसभेवर भगवा फडकावण्याचे आदेश ह्यमातोश्रीह्णवरून आले आणि लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेच्या निवडणुकीतसुद्धा यश मिळेलच, अशा खात्रीने अनेकांच्या डोक्यात हवा शिरली. मग काय, स्थानिक पदाधिकार्‍यांचे आपसात बिनसलेले असतानाच, मुंबईत बसून काही वरिष्ठांनी त्याला खतपाणी घालण्याचे काम इमानइतबारे केले. शिवसेनेसोबत नाळ जुळलेल्या जुन्या जाणत्या शिवसैनिकांसोबत ह्यसंपर्कह्ण साधून पक्षाची आगामी व्यूहरचना ठरविण्यापेक्षा ज्यांना जिल्हा परिषदेच्या तिकिटासाठी अक्षरश: लोटांगण घालावे लागते, अशा सदस्यांना थेट अकोला पूर्व मतदारसंघाच्या ितकिटाचे ह्यचॉकलेटह्ण देण्यात आले. जिल्हा परिषद सर्कलचा पुरेसा विकास न करू शकणार्‍या पुरुषांसह इच्छुक महिला उमेदवारांना मुंबईत बोलावून त्यांना जाणीवपूर्वक आश्‍वस्त करण्यात आले. हा इशारा ज्येष्ठ शिवसैनिकांना असला तरी या उफराट्या राजकीय समीकरणांमुळे जिल्ह्यात शिवसेनेचे वातावरण ढवळून निघाले आहे. यामध्ये प्रामुख्याने पूर्व मतदारसंघाचा समावेश असून या ठिकाणी तिकिटासाठी पक्षाच्या पदाधिकार्‍यांची आपसात जुं पल्याचे पाहून पूर्वाश्रमी भाजपात असलेल्या एका पदाधिकार्‍यालासुद्धा ह्यसाहेबांनीह्ण आश्‍वस्त केले. खुद्द ह्यसाहेबांह्णकडून हिरवी झेंडी मिळाल्यानंतर ह्यमा तोश्रीह्णवरून आलेल्या यादीत नावाचा समावेश करण्यासाठी संबंधित महाशयांनी थेट इंदूरच्या महाराजांना गळ घातली. महाराजांनीसुद्धा भक्ताच्या आर्त हाकेला साद देत, इच्छुकांच्या यादीत नावाचा समावेश झाला. स्थानिक इच्छुकांची २ सप्टेंबर रोजी ह्यमातोश्रीह्णवर चर्चा झाली असता, हा प्रकार समोर येताच, अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला.

** आधी सर्कलचा विकास करा!
यादीत नावाचा समावेश करण्यासाठी खटाटोप
अकोला पूर्व मतदारसंघासाठी इच्छुकांची मोठी संख्या आहे, हे दाखवण्यासाठी यादीत अनेकांच्या नावाचा पद्धतशीरपणे समावेश करण्यात आला. यामध्ये काही जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश होता. उद्धव ठाकरे यांच्यासमोर संबंधित जिल्हा परिषद सदस्यांनी परिचय पूर्ण करण्याआधीच त्यांना ह्यआधि तुमच्या सर्कलचा विकास कराह्ण असा सल्ला देत ठाकरे यांनी चर्चेला पूर्णविराम दिल्याची माहिती आहे.

Web Title: Shivaji's Vaishila for Shiv Sena's ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.