तूर खरेदीसाठी ‘शिवसंग्राम’चे ‘उठाबशा’ आंदोलन!

By Admin | Updated: April 26, 2017 01:36 IST2017-04-26T01:36:41+5:302017-04-26T01:36:41+5:30

तूर खरेदी सुरू करा, अन्यथा शेतकऱ्यांना आत्महत्येची परवानगी द्या!

Shiva Sangramram's 'upbringing' movement for buying tur | तूर खरेदीसाठी ‘शिवसंग्राम’चे ‘उठाबशा’ आंदोलन!

तूर खरेदीसाठी ‘शिवसंग्राम’चे ‘उठाबशा’ आंदोलन!

अकोला : हमीदराने ‘नाफेड’मार्फत बंद करण्यात आलेली तूर खरेदी सुरू करण्यात यावी, अन्यथा शेतकऱ्यांना आत्महत्येची परवानगी द्या, अशी मागणी करीत शिवसंग्राम संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘उठाबशा’ आंदोलन करण्यात आले.
राज्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी तुरीचे विक्रमी उत्पादन केले आहे; मात्र हमीदराने ‘नाफेड’द्वारे तूर खरेदीत शेतकऱ्यांची तूर पूर्ण खरेदी न करता, नाफेडद्वारे तूर खरेदी करण्यात आली. त्यामुळे तूर कोठे विकणार, असा प्रश्न तूर उत्पादक शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
शेतकरी आत्महत्या होत असतानाच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली तूर खरेदी बंद करण्यात आल्याने तूर उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे नाफेडद्वारे बंद करण्यात आलेली तूर खरेदी तातडीने सुरू करण्यात यावी, नाहीतर शेतकऱ्यांना आत्महत्येची परवानगी द्या, अशी मागणी करीत शिवसंग्रामच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उठाबशा आंदोलन छेडण्यात आले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष शिवा मोहोड यांच्या नेतृत्वात छेडण्यात आलेल्या या आंदोलनात बाळासाहेब ठाकरे, अक्षय हरणे, गोपाल देशमुख, प्रथमेश देशमुख, अक्षय वानखडे, संजय येवतकार, मयूर शिंदे, प्रवीण खुमकर, प्रशांत पळसपगार, सुरेश गावंडे, रमेश पवार, प्रवीण चतरकार, तेजराव सोळंके, अनिरुद्ध चतरकार, प्रवेश शेख, गणेश सुर्वे, सुनील दाते, संगम मोहोड, श्रीकांत खंडारे, विकास भोंडे, मनीष गर्क यांच्यासह शिवसंग्राम संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Shiva Sangramram's 'upbringing' movement for buying tur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.