शिवसेनेकडून सात हजार कुटुंबांना खाद्यतेलाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 11:31 AM2020-04-04T11:31:08+5:302020-04-04T11:31:54+5:30

पातूर तालुक्यातील आदिवासी भागातील सुमारे ७ हजार ३१२ कुटुंबीयांना खाद्यतेलाच्या वाटपाला सुरुवात केली.

Shiv Sena distributes edible oil to seven thousand families | शिवसेनेकडून सात हजार कुटुंबांना खाद्यतेलाचे वाटप

शिवसेनेकडून सात हजार कुटुंबांना खाद्यतेलाचे वाटप

Next

अकोला : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, संचारबंदीमुळे सर्वसामान्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. ज्यांचे हातावर पोट आहे, अशा गरजू नागरिकांसाठी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना सरसावल्या असून, शुक्रवारी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी पातूर तालुक्यातील आदिवासी भागातील सुमारे ७ हजार ३१२ कुटुंबीयांना खाद्यतेलाच्या वाटपाला सुरुवात केली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी खाद्यतेलाच्या वाहनांना हिरवी झेंडी दिली.
क ोरोना विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी केंद्र सरकारने १४ एप्रिलपर्यंत ‘लॉकडाउन’ तसेच राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. यादरम्यान कोरोनाच्या संसर्गजन्य रुग्णांच्या संख्येत घट येईल, अशी सरकारला अपेक्षा आहे. तूर्तास या संकटामुळे हातमजुरी करणाºया कुटुंबीयांसमोर दैनंदिन उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झाली आहे. त्यांना जीवन जगताना संघर्ष करावा लागत असल्याची ग्रामीण भागात परिस्थिती आहे. ही बाब ध्यानात घेता ग्रामीण भागातील गरजूंना मदत करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला असून, शिवसेनेने खाद्यतेलाचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. बाळापूर मतदारसंघातील दुर्गम व अतिदुर्गम भागात वास्तव्य करणाºया ७ हजार ३१२ आदिवासी कुटुंबांना खाद्यतेलाचे वितरण करण्यात येणार आहे. याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहासमोर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते खाद्यतेल घेऊन रवाना होणाºया वाहनांना हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, दिलीप बोचे, शहर प्रमुख (पूर्व)अतुल पवनीकर, शहर प्रमुख (पश्चिम) राजेश मिश्रा, नगरसेवक गजानन चव्हाण, उपशहर प्रमुख अभिषेक खरसाडे, उमेश जाधव, बबलू देशमुख, युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल कराळे, सुरेंद्र विसपुते, अजय जाधव (देशमुख), अजय पोहनकर, मुन्ना भाकरे, विशाल कपले, आकाश रामचवरे आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागात अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासणार नाही, याकडे लक्ष ठेवून आहोत. पातूर तालुक्यात दुर्गम व अतिदुर्गम भागातील आदिवासी कुटुंबांना खाद्यतेल पुरविल्या जाणार असून, प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत आरोग्यविषयक सुविधा देण्यावर भर आहे.
-नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख तथा आमदार शिवसेना

 

Web Title: Shiv Sena distributes edible oil to seven thousand families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.