शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

उमेदवारीसाठी शिवसेनेत गर्दी; शिवसेना भवनात इच्छुकांच्या मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 3:38 PM

शिवसेनेनेही जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांच्या शुक्रवारी मुंबईत मुलाखती घेतल्या.

अकोला: भाजप, शिवसेना युतीच्या आणाभाका दोन्ही पक्षाचे प्रमुख दररोज घेत असले तरी दोन्ही पक्षांनी प्रत्येक मतदारसंघासाठी उमेदवारांची चाचपणी करून स्वबळाची तयारी ठेवलेली दिसून आली आहे. शिवसेनेनेही जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांच्या शुक्रवारी मुंबईत मुलाखती घेतल्या. यावेळी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांनी शिवसेना भवनात मोठी गर्दी केली होती.विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी शिवसेना भवनात इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. या मुलाखतीसाठी जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातून इच्छुकांनी आपला दावा पक्षश्रेष्ठींपुढे सादर केला. भाजप-शिवसेना युतीसाठी जागा वाटपाची बोलणी सुरू असून, पाचपैकी किमान दोन मतदारसंघ शिवसेनेला मिळावे, असा सेनेचा आग्रह असून, बाळापूर, अकोट या मतदारसंघात उमेदवारीसाठी सर्वाधिक स्पर्धा असल्याचे आजच्या मुलाखतीवरून दिसून आले. ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोºहे, खासदार विनायक राऊत, खासदार संजय राऊत, माजी आमदार दगडू सकपाळ, विश्वनाथ नेरूळकर, अमोल कीर्तीकर, मनोहर गायकी, प्रवीण महाले यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या.अकोट मतदारसंघ सेनेला देण्याची पुन्हा मागणीचार विधानसभेसाठी राज्यात भाजप-सेना युतीसाठी जागा वाटपाची बोलणी सुरू असून, यामध्ये अकोट मतदारसंघ हा शिवसेनेला सोडण्यात यावा, अशी मागणी मुलाखतीनंतर सर्व इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींना भेटून केली. युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडेच होता. गेल्या वेळी या मतदारसंघात भाजपाचे आ.भारसाकळे विजयी झाले; मात्र त्यांच्या संदर्भात प्रचंड नाराजी असून, भाजपामध्येही त्यांच्या विरोधात बैठकांचे सत्र सुरू असल्याची माहिती यावेळी इच्छुकांनी नेत्यांना दिली.

आजी-माजी आमदार शर्यतीत; भाजपवर दबाव वाढविलाभाजप जागा वाटपात ताठर भूमिका घेत असल्याने शिवसेनेने सर्वच मतदारसंघासाठी मुलाखती देऊन भाजपवर अप्रत्यक्ष दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. भाजपच्या आमदारांविरोधात आम्ही लढू शकतो आणि हक्कांच्या मतांचे विभाजन करू शकतो, असाच संदेश सेनेने सर्व मतदारसंघासाठी मुलाखती घेऊन दिला आहे. विशेष म्हणजे अकोटात आ. गोपीकिशन बाजोरिया व माजी आ. संजय गावंडे या आजी-माजी आमदारांनीही मुलाखती देऊन पक्षासमोर समर्थ पर्याय ठेवला आहे.

यांनी दिल्या मुलाखतीअकोला पूर्वगोपाल दातकरश्रीरंग पिंजरकरमुकेश मुरुमकारविजय मालोकारमंगेश काळेदेवश्री ठाकरे

अकोला पश्चिमराजेश मिश्राअतुल पवनीकरप्रदीप गुरुखुद्देसुरेंद्र विसपुतेअश्वीन नवलेगजानन चव्हाणप्रकाश वानखडे

अकोटगोपीकिशन बाजोरियासंजय गावंडेअनिल गावंडेडॉ. विनित हिंगणकरदिलीप बोचेश्याम गावंडेविजय मोहोडराहुल श्याम कराळेमनीष कराळेमाया म्हैसने 

बाळापूरनितीन देशमुखसेवकराम ताथोडउमेशआप्पा भुसारीगोपाल दातकरराहुल सुरेश कराळेरविंद्र पोहरेज्योत्सना चोरेरेखा राऊतअजय ढोणेआनंद बनसरेसंजय भांबेरेगणेश तायडेरविंद्र मुर्तडकरसंजय शेळकेसुभाष धनोकारदीपक बोत्रेविठ्ठल सरपसुनील आवटेमूतीर्जापूरप्रा. डॉ. श्रीप्रभू चापकेदीपक सदाफळेमहादेव गवळे

 

टॅग्स :AkolaअकोलाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण