शिवसैनिकांनी केला नारायण राणेंचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 17:14 IST2021-08-24T17:14:16+5:302021-08-24T17:14:23+5:30

Shiv Sena protest against Narayan Rane at Akola : यावेळी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.  

Shiv Sainiks protest against Narayan Rane | शिवसैनिकांनी केला नारायण राणेंचा निषेध

शिवसैनिकांनी केला नारायण राणेंचा निषेध

अकोला :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ अकोल्यात शिवसेनेच्यावतीने निदर्शने करण्यात आली.  यावेळी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.  

राज्यात ठीकठिकाणी नारायण राणे यांच्या विरुद्ध आंदोलन सुरू आहेत. अकोल्यातही संतप्त शिवसैनिकांनी नारायण राणे यांचा फोटो गाढवाच्या चेहऱ्यावर लावून राणेंचा प्रतिकात्मक पुतळा गाढवावर बसवून धिंड काढली. यावेळी राणे यांचा 'कोंबडी चोर’चा पोस्टर घेऊन त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.  नारायण राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्नही शिवसैनिकांनी  केला मात्र, पोलिसांनी त्यांचा हा प्रयत्न हणून पडला. यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये काहीसा संघर्षही झाला. जय हिंद चौक ते गांधी रोड पर्यंत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.

Web Title: Shiv Sainiks protest against Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.