केशवनगर येथे शिवजयंती जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:29 IST2021-02-23T04:29:22+5:302021-02-23T04:29:22+5:30
अकाेला : केशवनगर (ता. रिसोड) येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात ...

केशवनगर येथे शिवजयंती जयंती साजरी
अकाेला : केशवनगर (ता. रिसोड) येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी स्व. बाबासाहेब धाबेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी प्राचार्य मधुकरराव चव्हाण होते. यावेळी प्रा. भागवत मोरे, भास्करराव दाभाडे यांच्यासह शालेय कर्मचारी उपस्थित होते. या निमित्ताने दोन्ही महत्वपूर्ण व्यक्तींच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रा. आत्माराम परिहार, प्रा. भारत भराड , प्रा. प्रदीप गवळी, प्रा. शिवाजी दळवी, विश्वनाथ सांगळे, राजकुमार बोनकिले, प्रा. पंकज आंबेकर, प्रा. कृष्णकांत इंगोले, प्रा. सुनील जगताप, राजू पगार, सोपान कोरडे, सोनाजी य. इंगळे, मधुकर जाधव, विजय पालवे, ज्ञानेश्वर देशमुख, रामदास बेंद्रे, राजकुमार शिंदे, भारत खंडारे यांच्यासह विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. (वा.प्र.)