कराेडी येथे शिवजयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:28 IST2021-02-23T04:28:36+5:302021-02-23T04:28:36+5:30

मनसंधारणातून जलसंधारण, रंभापूरला सन्मान अकाेट : महाराष्ट्र शासन व पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात ...

Shiv Jayanti celebrations at Karadi | कराेडी येथे शिवजयंती साजरी

कराेडी येथे शिवजयंती साजरी

मनसंधारणातून जलसंधारण, रंभापूरला सन्मान

अकाेट : महाराष्ट्र शासन व पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. अकाेट तालुक्यातील रंभापूर या स्पर्धक गावाने टप्पा तीनमध्ये विहिरींची पाणी पातळीचे माेजमाप पूर्ण केल्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते विहिरींचा एक्सरे रिपाेर्ट देऊन गावकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

...................

भरतपूरची बाैद्ध धम्म परिषद स्थगित

माझाेड : तथागत सदधम्म बहुउद्देशीय प्रशिक्षण मंडळ, भरतपूरच्या वतीने बाैद्ध धम्म परिषदेचे आयाेजन २७ व २८ फेब्रुवारी राेजी केले हाेते. मात्र, काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही परिषद स्थगित करण्यात आली आहे, असे परिषदेचे संयाेजक भास्करराव खंडारे यांनी कळविले आहे.

..............

‘शासनाच्या आदेशाचे पालन करा!’

बार्शिटाकळी : जिल्ह्यात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. नागरिकांनी काळजी घेत शासनाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन बार्शिटाकळीचे तहसीलदार गजानन हामंद यांनी केले. फिजिकल डिस्टन्सिंगसह मास्क लावून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Shiv Jayanti celebrations at Karadi