शिंगणे यांनी घेतला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:13 IST2021-06-17T04:13:58+5:302021-06-17T04:13:58+5:30

मोठी उमरी येथील सुशीलाबाई देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत ...

Shingane took stock of the district NCP | शिंगणे यांनी घेतला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आढावा

शिंगणे यांनी घेतला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आढावा

मोठी उमरी येथील सुशीलाबाई देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आतापर्यंत राबविण्यात आलेले उपक्रम व कार्याचा आढावा घेऊन भविष्यातील उपक्रमांबाबत मंत्री महोदयांनी मार्गदर्शन केले.

बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, प्रदेश उपाध्यक्ष संतोष कोरपे, आ. अमोल मिटकरी, माजी आमदार मा. प्रा. तुकाराम बीडकर, बळीराम सिरस्कार, हरिदास भदे, माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा पिसे पाटील, डॉ. आशा मिरगे, प्रा. विश्वनाथ कांबळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड, रमेशदादा हिंगणकर, विजय उजवणे, जावेद जकारिया, प्रा. सदाशिव शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत केलेल्या कार्याची माहिती जिल्हा पदाधिकारी व तालुका अध्यक्षांनी सादर केली.

अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्य आणखी चांगले होण्यासाठी व भविष्यातील जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर रणनीतीबाबत बैठकीत चर्चा झाली.

Web Title: Shingane took stock of the district NCP