शेगाव नगर परिषदेच्या उर्दु शाळेत मुख्याध्यापकास मारहाण

By Admin | Updated: August 2, 2016 23:08 IST2016-08-02T23:08:28+5:302016-08-02T23:08:28+5:30

शेगाव नगर परिषदेच्या शहिद-ए-वतन टिपु सुल्तान उर्दु शाळेत एका पालकाकडून मुख्याध्यापकाला मारहाण झाल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेने शिक्षक वर्गात भीतीचे

Shegaon municipal council's main school is beaten up by the headmistress | शेगाव नगर परिषदेच्या उर्दु शाळेत मुख्याध्यापकास मारहाण

शेगाव नगर परिषदेच्या उर्दु शाळेत मुख्याध्यापकास मारहाण

>ऑनलाइन लोकमत
शेगाव, दि. २ -  शेगाव नगर परिषदेच्या शहिद-ए-वतन टिपु सुल्तान उर्दु शाळेत एका पालकाकडून मुख्याध्यापकाला मारहाण झाल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेने शिक्षक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सदर प्रकरण दाबण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 
शाळेत दुपारी जेवणाची सुटी असतांना एका विद्यार्थ्याच्या अंगावर दुसºया विद्यार्थ्याच्या हातातील खिचडीची प्लेट पडल्याच्या कारणावरून मोठा राडा झाला.१ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजता दरम्यान विद्यार्थ्यांना दाळ व भाताचे वितरण सुरू असतांना एका मोठ्या विद्यार्थ्यांच्या हातून प्लेट सुटून पहिल्या वगार्तील एका विद्यार्थ्यांच्या अंगावर पडली. त्यानंतर शाळेच्या शिक्षकांनी त्या विद्यार्थ्याला खिचडीमुळे लागलेल्या जखमेवर प्रथमोपचार केले.व बहिणीसोबत त्याला त्याच्या घरी पाठविले. त्यानंतर दुपारच्या सुटीत त्या विद्याथ्यार्चे मोठे वडील शे.नईम शे.महेबूब हे शाळेत आले आणि त्यांनी काहीही विचारपूस न करता शाळेचे मुख्याध्यापक मो.साबीर यांच्या श्रीमुखात लगावली. घटनास्थळी शाळेचे शिक्षक मो.इरफान, व्यवस्थापन समिती उपाध्यक्षांचे पती मो.रियाज, सदस्य शे.हमिद हे उपस्थित होते. त्यानंतर शाळेत परिसरातील नागरिकांची एकच गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच फिरोजखान तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गुलाम नबी, अ.समद यांनी घटनास्थळी धाव घेवून वातावरण निवळण्यासाठी मध्यस्थी केली. त्यानंतर वातावरण शांत झाले. दरम्यान गेल्या शुक्रवारी या शाळेचे सहा.शिक्षक समद यांनी एका विद्यार्थ्याला त्याने मारामारी केल्यावरून शिक्षा केली त्यामुळे संबधित विद्यार्थ्यांच्या पालकाने मद्यधुंद अवस्थेत शाळेत येवून शिक्षकांना शिव्यांची लाखोली वाहल्याची घटना घडली होती. अशा मारामारीच्या व शिविगाळीच्या घटना पालकवर्गाकडून होत असल्यामुळे या शाळेच्या शिक्षकवर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षकवर्ग प्रचंड तणावाखाली काम करीत आहेत. तथापी मुख्याध्यापकास मारहाण होण्यासारखी मोठी घटना घडलेली असतांना न.प. शिक्षण विभागाच्या कुठल्याही अधिकारी किंवा कर्मचा-याने सदर शाळेला साधी भेटही दिली नाही.
                           
उर्दु शाळेतील घटने बाबत मुख्याध्यापक मो.साबीर यांनी लेखी कळविले आहे. शिक्षकांना संपूर्ण संरक्षण पुरविणे न.प.प्रशासनाची जबाबदारी आहे. या बाबत चौकशी करणार असून आवश्यकता भासल्यास पोलीसांत तक्रार करून फौजदारी स्वरूपाचीही कारवाई केल्या जाईल. त्यामुळे शिक्षकांनी कोणतीही
भिती न बाळगता अध्यापनाचे कार्य योग्य रितीने पार पाडावे.
                      - अतुल पंत
                  मुख्याधिकारी, न.प.शेगाव

Web Title: Shegaon municipal council's main school is beaten up by the headmistress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.