विभागीय ‘गो-गर्ल्स-गो’ स्पर्धेत शीतलची सुवर्ण कामगिरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 17:48 IST2020-03-05T17:47:56+5:302020-03-05T17:48:04+5:30
शीतल हागे हिने १४ ते १८ वर्षे वयोगटात १०० मीटर धावणे प्रकारात अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत सुवर्ण पदकाची कमाई केली.

विभागीय ‘गो-गर्ल्स-गो’ स्पर्धेत शीतलची सुवर्ण कामगिरी!
अकोला: फिट इंडिया मोहिमेंतर्गत आयोजित अमरावती विभागीय ‘गो-गर्ल्स-गो’ क्रीडा स्पर्धा अमरावती येथे गुरुवारी पार पडली. या स्पर्धेत तेल्हाऱ्याची शीतल हागे हिने १४ ते १८ वर्षे वयोगटात १०० मीटर धावणे प्रकारात अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत सुवर्ण पदकाची कमाई केली. या कामगिरीमुळे ८ मार्च रोजी पुणे येथे होणाºया राज्यस्तरीय स्पर्धेकरिता शीतलची निवड झाली आहे.
बुधवारी जिल्हास्तरीय स्पर्धेत शीतलने १४ ते १८ वयोगटात द्वितीय स्थान पटकावले होते; मात्र आज शीतलने अमरावतीमध्ये आपले कौशल्य पणाला लावून विभागात प्रथम स्थान मिळवून अकोला जिल्ह्याचे नावलौकिक केले. शीतलही ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील सदस्य आहे. तेल्हाºयातील दानापूर गावात हनुमान प्रसाद साह जनता विद्यालयात शिकते. क्रीडा शिक्षक नितीन मंगळे यांच्या मार्गदर्शनात शीतल सराव करते. शाळा व्यवस्थापन समितीचे डॉ. अजय विखे, तेल्हारा तालुका संयोजक शांतीकुमार सावरकर यांचे मार्गदर्शन शीतलला लाभले. जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, क्रीडा अधिकारी चारुदत्त नाकट, दिनक र उजळे, गणेश कुळकर्णी, वैशाली इंगळे, लक्ष्मीशंकर यादव व मनीषा ठाकरे यांनी शीतलचे कौतुक केले.