शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

काँग्रेसला हादरा : न.प.च्या उपाध्यक्षपदी सुरेश जामनिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:19 IST

बार्शिटाकळी : अडीच वर्षापूर्वी बार्शिटाकळी नगरपंचायतच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी काँग्रेस उमेदवार निवडून आले होते; मात्र उपाध्यक्ष पदासाठी मंगळ‌वारी ...

बार्शिटाकळी : अडीच वर्षापूर्वी बार्शिटाकळी नगरपंचायतच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी काँग्रेस उमेदवार निवडून आले होते; मात्र उपाध्यक्ष पदासाठी मंगळ‌वारी झालेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, भारतीय जनता पार्टी व अपक्षांनी एकत्र येऊन युती करीत न.प.च्या उपाध्यक्षपदी सुरेश सुखदेव जामनिक यांना विजयी केले.

नगर पंचायत उपाध्यक्षपद मिळविण्यासाठी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील धाबेकर हे शहरात तळ ठोकून होते. दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडी व भाजपा यांनी ईश्वरचिठ्ठी काढून व अपक्षांना सोबत घेऊन उमेदवार ठरविला. नगरपंचायत उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी तीन उमेदवारांनी नामांकन अर्ज भरले होते. वंचित बहुजन आघाडी, भाजपा व अपक्ष युतीचे सुरेश सुखदेव जामनिक, काँग्रेसकडून मीना बबन राऊत व भाजपाच्या जयश्री रमेश वाटमारे यांनी नामांकन अर्ज भरले होते. ऐनवेळी भाजपाच्या जयश्री रमेश वाटमारे यांनी माघार घेतल्याने सुरेश सुखदेव जामनिक व मीना बबन राऊत यांच्यात लढत झाली. वंचित बहुजन आघाडी, भाजपा व अपक्ष युतीचे उमेदवार सुरेश सुखदेव जामनिक विजयी झाले. सुरेश जामनिक यांना ‘वंचित’चे सुनील सिरसाठ, कमला धुरंधर, नसीम खान, साबीया परवीन सै अब्रार, लाईका खातून सरफराज खान, भाजपाचे ॲड. विनोद राठोड, जयश्री रमेश वाटमारे, छाया राजेश साबळे, अपक्ष इफ्तेखारोद्दीन काजी सईदोद्दीन, अर्शद खान व स्वतः सुरेश जामनिक अशी अकरा मते पडली. काँग्रेसच्या उमेदवार मीना बबन राऊत यांना मेहफुज खान, हसन शहा, मनिषा बोबडे, नुसरत जमील, अ. अकील व स्वतः मीनाताई राऊत अशी ६ मते मिळाली. काँग्रसच्या नगरसेविका शबनम परविन शहा या गैरहजर होत्या. यावेळी पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष मेहफुज खान यांनी जाहीर केले. निवडणुकीसाठी मुख्यधिकारी स्नेहल राहाटे व प्रकाश हिरडकर यांनी सहकार्य केले. यावेळी इम्रान खान, रमेश वाटमारे, नईमोद्दीन भाई, चंदूशेठ, अन्सार खान, ॲड. जामनिक , गोबाशेठ, कदीर जमादार, शैलेश सिरसाट आदी उपस्थित होते. (फोटो)