शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:18 IST2021-02-05T06:18:16+5:302021-02-05T06:18:16+5:30

निराधारांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न- पालकमंत्री कडू अकोला - बेघर निवाऱ्यात राहत असलेल्या निराधारांच्या हाताला काम, रोजगार देऊन त्यांचे सुयोग्य ...

Shahu Maharaj Quality Award | शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार

शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार

निराधारांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न- पालकमंत्री कडू

अकोला - बेघर निवाऱ्यात राहत असलेल्या निराधारांच्या हाताला काम, रोजगार देऊन त्यांचे सुयोग्य पुनर्वसन करून त्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री बच्चू कडू यांनी येथील महापालिकेच्या बेघर निवारा येथील आश्रितांना दिली.

पालकमंत्री कडू यांनी येथील बेघर निवारा येथे मंगळवारी रोजी भेट दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या वतीने येथील रहिवाशांना कपडे वाटप केले तसेच त्यांना जेवणही दिले. शिवाय संस्थेसाठी पाण्याचे फिल्टर यंत्रही बसवून दिले. यावेळी अकोल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, तहसीलदार विजय लोखंडे, उपायुक्त पूनम कडंबे, आशाकिरण महिला विकास संस्थेच्या दुर्गा भड, व्यवस्थापक उषा राऊत आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते निराधारांना वैद्यकीय तपासणीनंतर प्राप्त चष्मेही वाटप करण्यात आले. गतवेळी पालकमंत्र्यांनी भेट दिल्यानंतर या निवारा केंद्राचे शौचालय, स्वच्छतागृहांची दुरुस्ती, रंगरंगोटी, दोन कक्षांचे नूतनीकरण पूर्ण करण्यात आले. या कामाचीही त्यांनी पाहणी केली. येथील रहिवाशांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आदी योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला. त्याचे प्रमाणपत्र वाटपही यावेळी करण्यात आले.

आता या केंद्राला बेघर निवारा केंद्र न म्हणता ‘संत गाडगेबाबा घर’ असे म्हणावे असे ना. कडू यांनी सांगितले. येथील रहिवाशांनी आता भीक न मागता स्वतः काम करावे. त्यांना त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार अगरबत्ती बनविणे, महिलांना कापसाच्या फुलवाती तयार करणे असे व्यवसाय देऊन त्यातून त्यांना अर्थार्जन होईल. त्यातून त्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन ना. कडू यांनी यावेळी दिले. आशाकिरण महिला विकास संस्था, अकोलाच्या अध्यक्ष दुर्गा भड,व्यवस्थापक उषा राऊत, प्रकल्प अधिकारी शंतनु भड, शीतल उमाळे, वैभव बोळे, अक्षय बुंदेले, शुभम ठाकूर, संतोष ठाकूर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

०००००

Web Title: Shahu Maharaj Quality Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.