शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेवर अत्याचार; पतीवर जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 14:05 IST

आरोपीने फिर्यादीच्या पतीजवळची तलवार हिसकावून त्यास ठार मारण्याचा प्रयत्न केला.

मंगरूळपीर : विवाहितेवर अत्याचार करून तिच्या पतीवर तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगरूळपीर शहरातील दिवानपुरा येथे २२ सप्टेंबरच्या रात्रीदरम्यान घडली. याप्रकरणी जावेदखान जायदखान (२७) रा. दिवानपुरा याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.शहरातील दिवानपुरा येथील एका २३ वर्षीय विवाहितेच्या तक्रारीनुसार, २२ सप्टेंबरच्या रात्री दरम्यान आरोपी जावेदखान जायदखान याने फिर्यादीच्या घरी येऊन अनैतिक संबंधासाठी बळजबरी केली. फिर्यादीने आरडाओरड केली असता, फिर्यादीचा पती हा तलवार घेऊन आला. आरोपीने फिर्यादीच्या पतीजवळची तलवार हिसकावून त्यास ठार मारण्याचा प्रयत्न केला. या तक्रारीवरून मंगरूळपीर पोलिसांनी आरोपी विरुद्ध भांदवी कलम ३०७,३७६,४४९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस अटक करून २३ सप्टेंबरला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.दरम्यान, याप्रकरणी जावेदखान जायदखान यांनीही फिर्याद दिली असून, तलवारीने हल्ला केल्याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. जावेदखान जायदखान यांनी तक्रारीत नमूद केले, की २२ सप्टेंबरच्या रात्री ते एकटे घरी जात असताना आरोपी शे. शब्बीर शे. हुसेन, शे. आसिफ शे. हुसेन यांनी क्षुल्लक कारणारून शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच घरातून तलवार आणून अंगावर उगारली. यावेळी प्रसंगावधान राखून आरोपीच्या हातातील तलवार हिसकावून घेतली असता त्यात जखमी झालो. अशा फिर्यादीवरून पोलिसांनी नमूद दोन्ही आरोपींवर भादंविचे कलम ३२४, ५०४, ५०६, आर्म अ‍ॅक्ट ३, २५ व कलम ३४ नुसार गुन्हा दाखल केला.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारीMangrulpirमंगरूळपीर