युवतीचे लैंगिक शोषण; गुन्हा दाखल

By Admin | Updated: July 29, 2014 20:28 IST2014-07-29T20:28:49+5:302014-07-29T20:28:49+5:30

लग्नाचे आमिष दाखवून तिचे तीन वर्षांपर्यंत लैंगिक शोषण केल्याप्रकरणी खदान पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Sexual harassment of the victim; Filed the complaint | युवतीचे लैंगिक शोषण; गुन्हा दाखल

युवतीचे लैंगिक शोषण; गुन्हा दाखल

अकोला: युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे तीन वर्षांपर्यंत लैंगिक शोषण केल्याप्रकरणी खदान पोलिसांनी रात्री आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
खदान भागातील कैलास टेकडी भागात राहणार्‍या २१ वर्षीय युवतीला परिसरातच राहणार्‍या सोनू गवईने (२४) लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तीन वर्ष तो युवतीचे लैंगिक शोषण करीत होता. लग्नाला कुटुंबीयांचा विरोध असल्याने त्याने सांगत लग्न करण्यास तिला नकार दिला. त्यामुळे शुक्रवारी उशिरा रात्री खदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनुसार खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: Sexual harassment of the victim; Filed the complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.