लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:14 IST2021-06-26T04:14:53+5:302021-06-26T04:14:53+5:30

खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गावातील विवाहित महिलेला चतारी येथील एका आरोपीने लग्नाचे ...

Sexual harassment by showing the lure of marriage | लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार

खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गावातील विवाहित महिलेला चतारी येथील एका आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. गेल्या काही महिन्यापासून विवाहित महिला लग्न करण्याचा तगादा लावत होती. मात्र आरोपीने नकार दिल्याने विवाहित महिलेने दि. २४ जून रोजी चान्नी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी चतारी येथील आरोपी ज्ञानेश्वर श्रीराम बने याच्याविरुद्ध ३७६, ३७६ ,(२)(एन) ४१७ कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. दि. २५ जून रोजी पातूर न्यायालयात हजर केले असता, आरोपीला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश पातूर न्यायालयाने दिली आहे. पुढील तपास चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गणेश नावकार करीत आहेत.

Web Title: Sexual harassment by showing the lure of marriage