अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

By Admin | Updated: March 9, 2015 01:48 IST2015-03-09T01:48:59+5:302015-03-09T01:48:59+5:30

अकोला येथील प्रकार; गरोदर मुलगी रुग्णालयात भरती, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.

Sexual exploitation of a minor girl | अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

अकोला: बहिणीच्या बाळंतपणामध्ये मदत करण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय मुलीचे तिच्या बहिणीच्या दिराने लैंगिक शोषण केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी रविवारी सायंकाळी दिरावर गुन्हा दाखल केला. जिल्हय़ातील एका गावामध्ये राहणार्‍या १६ वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या मोठय़ा बहिणीच्या बाळंतपणासाठी औरंगाबाद येथील वाळुंज येथे गेले होती. या ठिकाणी तिच्या बहिणीचा दीर उमेश साहेबराव तायडे हा तेथे यायचा. घरात कोणी नसताना तो नेहमी बहिणीकडे यायचा. दारूच्या नशेमध्ये त्याने तिच्यावर बळजबरी लैंगिक अत्याचार केला. त्यानंतरही त्याने अधूनमधून येऊन सातत्याने लैंगिक अत्याचार केला. यातून अल्पवयीन मुलीला दिवस गेले. ती गरोदर असल्याचे तिच्या आई-वडिलांना लक्षात आल्यावर त्यांनी २ मार्च रोजी सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी मुलगी कुमारिका असल्याने बालकल्याण समितीला पाचारण केले. बालकल्याण समितीच्या सदस्यांनी पीडित मुलीची चौकशी केल्यानंतर तिने आपबिती सांगितली. त्यानुसार पीडित मुलीने रविवारी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी उमेश साहेबराव तायडेविरुद्ध भादंवि कलम ३७६ व बाल लैंगिक संरक्षण अधिनियमानुसार (पॉस्को) गुन्हा दाखल केला.

Web Title: Sexual exploitation of a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.