सात हजार अकोलेकरांनी सामुहिक सूर्यनमस्कार केले.
By Admin | Updated: February 10, 2017 13:36 IST2017-02-10T13:36:28+5:302017-02-10T13:36:28+5:30
जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधत आज अकोल्यातील लालबहादूर शास्त्री स्टेडियमवर सकाळी नऊ वाजता सामूहिक सूर्यनमस्कार घालण्यात आले.

सात हजार अकोलेकरांनी सामुहिक सूर्यनमस्कार केले.
>
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १० - जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधत आज अकोल्यातील लालबहादूर शास्त्री स्टेडियमवर सकाळी नऊ वाजता सामूहिक सूर्यनमस्कार घालण्यात आले. अकोला शहरातील शाळा,महाविद्यालय अणि सामाजिक संस्थांनी यामध्ये सहभाग घेतला होता.लालबहादूर शास्त्री स्टेडियम आज लयबद्ध सूर्यनमस्कार अन सूर्यनमस्कार मंत्रांनी दणाणून गेलं होतं. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा विभाग, अजिंक्य फिटनेस क्लब आणि रोटरी क्लबसह इतर सामाजिक संघटनांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. खंडेलवाल स्कूल च्या योग डान्स ने कार्यक्रमात रंगत आणली. दिव्यांग सुभाष महुलकर, गतिमंद आशिष नेताम आणि बालविकास विशेष कर्ण बधीर शाळेच्या मुलांनी कार्यक्रम सहभाग घेतला