चिमुकल्यांनी दोन तासांत साकारले सात दगडी बांध
By Admin | Updated: April 26, 2017 19:39 IST2017-04-26T19:39:39+5:302017-04-26T19:39:39+5:30
शिर्ला : बुद्धभूमीच्या माळरानावर पातूर किड्स पॅराडाईजच्या चिमुकल्यांच्या इवल्याशा हातांनी सात दगडी बांध अवघ्या दोन तासांत बनविले.

चिमुकल्यांनी दोन तासांत साकारले सात दगडी बांध
शिर्ला : बुद्धभूमीच्या माळरानावर पातूर किड्स पॅराडाईजच्या चिमुकल्यांच्या इवल्याशा हातांनी सात दगडी बांध अवघ्या दोन तासांत बनविले. यामुळे शेकडो लीटर पाणीसाठा क्षेत्रात निर्माण झाला.
बुधवारी सकाळी ७ वाजता पातूर येथील किड्स पॅराडाईजचे ५० चिमुकले शिर्लाच्या बुद्धभूमीच्या माळरानावर दाखल झाले. चिमुकल्यांच्या इवल्याशा हातांनी सात दगडी बांध घातले. गेल्या ८ एप्रिलपासून शिर्ला गावाने वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला आहे. १६ दिवसांपासून येथे अखंड श्रमदान सुरू आहे. शिर्ला गावाला कधीच दुष्काळाची दाहकता जाणवू नये, यासाठी पाणलोट क्षेत्रात पडणारे पावसाचे पाणी मुरविण्यासाठी विविध जलसंधारणाचे उपचार या माध्यमातून केले जात आहेत. बाल श्रमदान मोहिमेसाठी किड्स पॅराडाईजचे संचालक गोपाल गाडगे, सहअध्यापक चंद्रमणी वानखडे, मुकुंद खंडारे, अंनता थोराईत, प्रिया अमरावतीकर, अर्चना गाडगे, सुजाता सोनोने, योगीता गिऱ्हे, राधा इनामदार, रूपाली पोहरे, तलाठी नंदकिशोर जाने, ग्रामसेवक राहुल उंदरे आदींसह शिर्ला येथील जलसैनिक उपस्थित होते.