नऊ बैलांसह चार लाखांचा ऐवज जप्त
By Admin | Updated: May 14, 2017 04:16 IST2017-05-14T04:16:50+5:302017-05-14T04:16:50+5:30
चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नऊ बैलांसह चार लाखांचा ऐवज जप्त
हिवरखेड : जनावरांना निर्दयीपणे घेऊन जात असताना हिवरखेड पोलिसांनी नऊ जनावरांसह दोन वाहने जप्त केली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिवरखेडवरून सौंदळ्याकडे जात असताना कार्ला फाट्याजवळ एमएच ३0 एव्ही 0४२८ व एमएच 0४ इबी २७८५ या वाहनांमध्ये ८ बैल व १ वगार यांची निर्दयीपणे वाहतूक करण्यात येत होती. यावेळी पोलिसांनी संशयावरून दोन्ही वाहने अडवली असता त्यामध्ये हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी नऊ जनावरांसह दोन वाहने, असा चार लाखांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी पीएसआय आशिष शिंदे यांच्या फिर्यादीवरून शेख अहसान शे. जाबीर (३१) दिवानझरी, शकीलोद्दीन शरिफोद्दीन, युनुसखाँ युसूफ खाँ यांच्याविरुद्ध कलम ५, ५ (अ), ९, ९ अ, म. प्राणी संरक्षण कायदा १९९५ व कलम ११ (ड) (ई) (फ) गुन्हा दाखल केला. तपास पीएसआय शरद भस्मे, हवालदार गोपाल दातीर, नंदू सुलताने, चव्हाण करीत आहेत.