साडेसहा लाख लीटर्स बनावट दारू जप्त

By Admin | Updated: December 27, 2014 23:48 IST2014-12-27T23:48:26+5:302014-12-27T23:48:26+5:30

वर्षभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची राज्यभर कारवाई.

Seven hundred liters of fake liquor seized | साडेसहा लाख लीटर्स बनावट दारू जप्त

साडेसहा लाख लीटर्स बनावट दारू जप्त

अनिल गवई / खामगाव: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने १ मार्च ते १५ डिसेंबरच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत तब्बल साडेसहा लाख लीटर्स देशी आणि विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांत अवैध मद्य विक्री तसेच गावठी दारू तयार करण्याच्या प्रकारात वाढ झाली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने गुप्त माहिती व भरारी आणि अचानक तपासणी मोहिमेंतर्गत राज्यभर मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान, इतर राज्यातून चोरट्या मार्गाने (उत्पादन शुल्क बुडवून) आणण्यात आलेल्या देशी, विदेशी दारूच्या साठय़ासह सुमारे साडेसहा लाख लीटर्स बनावट दारू जप्त करण्यात आली. यामध्ये सात लक्ष ३२ हजार लीटर्स देशी दारूचा समावेश असून ९ हजार लीटर्स विदेशी दारूचा समावेश असल्याची माहिती आहे.

*नवीन वर्षाच्या स्वागत पाटर्य़ांवरही करडी नजर
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठय़ा प्रमाणात देशी, विदेशी दारूचा वापर केला जातो. यासाठी राज्यात देशाच्या कानाकोपर्‍यातून देशी, विदेशी दारूची चोरटी आयात केली जाते. त्यामुळे राज्याचा महसूल बुडतो. मात्र, यंदा दारूच्या तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आपली दृष्टी वळविली आहे. ३१ डिसेंबरपूर्वी अचानक तपासणी पथकाच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात दारू जप्त केली जाणार असल्याचे संकेत आहेत.

*साडेतीन हजारांवर गुन्हे!
देशी आणि विदेशी दारूच्या तस्करीसोबतच बनावट मद्य विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने १५ डिसेंबरपर्यंत तब्बल तीन हजार ५४७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. तसेच १८00 जणांना अटक करण्यात आली. त्याचप्रमाणे हातभट्टीसाठी वापरण्यात येणारा दीड लाख लीटर्स इतका कच्चा मालही जप्त करण्यात आला आहे.

Web Title: Seven hundred liters of fake liquor seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.