Seven deaths in a day; 87 new positive, 185 coronal free |  दिवसभरात सात जणांचा मृत्यू; ८७ नवे पॉझिटिव्ह, १८५ कोरोनामुक्त

 दिवसभरात सात जणांचा मृत्यू; ८७ नवे पॉझिटिव्ह, १८५ कोरोनामुक्त

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, बुधवार, ३० सप्टेंबर रोजी अकोला शहरातील चार आणि पातूर, वडद व अकोट येथील प्रत्येकी एक अशा एकूण सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या एकूण बळींचा आकडा २३६ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ८७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७४८२ झाली आहे. दरम्यान, बुधवारी १८५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ३८६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ८७ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २९९ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये गोकुल कॉलनी येथील सात, जठारपेठ येथील सहा, सिंधी कॅम्प येथील चार, डाबकी रोड व केडीया प्लॉट येथील प्रत्येकी तीन, आदर्श कॉलनी येथील दोन, मनकर्णा प्लॉट, रामदासपेठ, छोटी उमरी, राधानगर, अंबिका नगर, आळशी प्लॉट, मुर्तिजापूर, खडकी, सिरसो, हिवरखेड, फिरदोस कॉलनी, भावसारपूरा, शांती नगर, शिवसेना वसाहत, आरएलटी कॉलेज, आरएमओ हॉस्टेल, गुलजारपुरा, शास्त्री नगर, सातव चौक व अकोट येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी अकोट येथील नऊ, मुर्तिजापूर येथील आठ, बाळापूर व कोठारी येथील तीन, पारस व बोर्डी येथील दोन, जठारपेठ, गुजराती पुरा, निंबा, रणपिसे नगर, जूने शहर, बोरगाव मंजू, व्हीएसबी कॉलनी, तुलंगा, गीतानगर, श्रीराम हॉस्पीटल, डाबकी रोड, पोही, शेलू, कौलखेड व जठारपेठ येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.


सात पुरुषांचा मृत्यू
बुधवारी एकूण सात जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये डाबकी रोड, अकोला येथील ६४ वर्षीय पुरुष, सिव्हील लाईन येथील ५५ वर्षीय पुरुष, मलकापूर येथील ६५ वर्षीय पुरुष, जोगळेकर प्लॉट येथील ७५ वर्षीय पुरुष, वडद, अकोला येथील ७० वर्षीय पुरुष, पातूर येथील ६५ वर्षीय पुरुष आणि अकोट येथील ७२ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.


१८५ कोरोनामुक्त
बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून २४, कोविड केअर सेंटर अकोला येथून आठ, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून दोन, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, अकोला अ‍ॅक्सीडेंट क्लिनिक येथून दोन, सूर्यचंद्रा हॉस्पीटल येथून तीन, आयुर्वेदीक महाविद्यालय येथून चार, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, हॉटेल स्कायालार्क येथून दोन, कोविडा केअर सेंटर, हेंडज येथून पाच तर होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेले १३० अशा एकूण १८५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

१,३७२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,४८२ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ५८७४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २३६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,३७२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Seven deaths in a day; 87 new positive, 185 coronal free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.