गायगाव येथील जुगारावरून सात अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:17 IST2021-01-21T04:17:44+5:302021-01-21T04:17:44+5:30
अकाेला : उरळ पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गायगाव येथे खुलेआम सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनातील ...

गायगाव येथील जुगारावरून सात अटकेत
अकाेला : उरळ पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गायगाव येथे खुलेआम सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनातील दहशतवाद विराेधी पथकाने बुधवारी छापा टाकला. या जुगार अड्ड्यावरून सात जुगारींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून राेखरकमेसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गायगाव येथे माेठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असताना दहशतवाद विराेधी पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी पथकासह छापा टाकून सुभाष उत्तम घुगे, आयुबखान मन्सारखान, सुभाष डिगांबर आगरकर, सचिन गुलाबराव वानखेडे, गणेश रतन खेतकर सर्व राहणार गायगाव, गुलामहुसेन सरदार देशमुख व तेजराव शालिकराम भटकर रा. लोहारा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या जुगारींविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.