अकोट फैल हाणामारीतील सात आरोपी जेरबंद

By Admin | Updated: October 25, 2016 03:07 IST2016-10-25T03:07:22+5:302016-10-25T03:07:22+5:30

आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी.

Seven accused in the Akot sprawl operation Zirband | अकोट फैल हाणामारीतील सात आरोपी जेरबंद

अकोट फैल हाणामारीतील सात आरोपी जेरबंद

अकोला, दि. २४- ऑटो अडविल्यानंतर अकोट फैलमधील भीम चौकात झालेल्या मारहाण आणि दगडफेक प्रकरणात पोलिसांनी सोमवारी सात आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. अकोट फैलातील अशोकनगरमध्ये एक ऑटो चालक त्याचा ऑटो घेऊन जात असताना या भागातील युवकांनी त्याला अडविले. ऑटोचालक आणि अडविणार्‍यामध्ये यावेळी लोटालाटी झाली. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. ही माहिती या भागात पसरताच ऑटोचालकाचे सर्मथकही जमा झाले. त्यामुळे दोन गटात हाणामारी होऊन प्रचंड दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे येथे तणाव निर्माण झाला होता; मात्र पोलीस बंदोबस्त तैनात केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. या प्रकरणी शेख अन्वर शेख मकसुद, मिर्झा रहेबर बेग मिर्झा अझहर बेग, शेख रफीक शेख नासीर, शेख अझहर शेख मकसुद, मुनाफ ठेकेदार ऊर्फ अब्दुल मुनाफ अब्दुल रशीद, शेख रिहाण शेख युसुफ या सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी विजय वसंत रक्षक यांनी अकोट फैल पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सदर आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३३७, १४३, १४७, ५0४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर या सातही आरोपींना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींची कारागृहात रवानगी केली.

Web Title: Seven accused in the Akot sprawl operation Zirband