शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

काचेच्या घरात राहणाऱ्यांची एकमेकांवर दगडफेक; भारिप-राष्ट्रवादीमध्ये आरोपांचे सत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 12:55 IST

अकोल्यात भारिप-बमंस व राष्टÑवादी काँग्रेस यांच्यामध्ये सुरू असलेली आरोपांंची दगडफेक ही काचेच्या घरात राहणºयांनी एकमेकांवर केलेली दगडफेक अशीच आहे.

ठळक मुद्दे राष्टÑवादीचे नेते शरद पवार हे जातीयवादी आहेत, अशी बोचरी टीका अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी केली. साहजिकच पवारांनी तत्परतेने पलटवार करून आंबेडकरांना त्यांच्या दोन निवडणुकांचे स्मरण करून दिले. पवार हे धादांत खोटे बोलत आहेत. अशी भूमिका आंबेडकरांनी घेतल्यावर सध्या राज्यभर आरोप-प्रत्यारोपाचे मोहळ उठले आहे.

- राजेश शेगोकार

अकोला: जिनके घर शिशे के होते है, वो दूसरो पे पत्थर नही मारा करते...हिंदी चित्रपटातील हा संवाद दार्शनिक ठरला आहे. राजकारण या क्षेत्राला तर तो चपखलपणे आरसा दाखवितो. हा संवाद आठवण्याचे कारण म्हणजे सध्या अकोल्यात भारिप-बमंस व राष्टÑवादी काँग्रेस यांच्यामध्ये सुरू असलेली आरोपांंची दगडफेक ही काचेच्या घरात राहणºयांनी एकमेकांवर केलेली दगडफेक अशीच आहे. या आरोपांच्या सत्राला निमित्त ठरले ते राष्टÑवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व भारिप-बमंचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी एकमेकांवर केलेले आरोपअ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम सोबत आघाडी जाहीर करताच काँग्र्रेसने आघाडीसाठी आंबेडकरांची गळाभेट घेतली. यावेळी आंबेडकरांनी काँग्रेस सोबत आघाडी करू; पण राष्टÑवादी सोबत नाही. राष्टÑवादीचे नेते शरद पवार हे जातीयवादी आहेत, अशी बोचरी टीका केली. साहजिकच पवारांनी तत्परतेने पलटवार करून आंबेडकरांना त्यांच्या दोन निवडणुकांचे स्मरण करून दिले. ज्यावेळी आंबेडकरांनी पाठिंबा घेतला त्यावेळी आम्ही जातीयवादी नव्हतो का? असा सवाल उपस्थित केल्यावर पवार हे धादांत खोटे बोलत आहेत. अशी भूमिका आंबेडकरांनी घेतल्यावर सध्या राज्यभर आरोप-प्रत्यारोपाचे मोहळ उठले आहे. अकोला ही आंबेडकरांची राजकीय राजधानी त्याला अपवाद कशी ठरेल. अकोल्यात राष्टÑवादीच्या झाडून सर्व नेत्यांनी एकत्र येत आंबेडकरच खोटे असे हे पत्रकार परिषदेत ठासून सांगितले. या पत्रकार परिषदेत माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांची भूमिका अतिशय आक्रमक होती, त्यामुळे त्यांनाच टार्गेट करीत दुसºया दिवशी भारिपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांनी प्रत्युत्तर देत राष्टÑवादीच्या नेत्यांची वैचारिक पातळीच काढली. या पृष्ठभूमीवर पश्चिम वºहाडाच्या राजकारणाचा आढावा घेतला तर या दोन्ही पक्षांनी कधी ना कधी एकमेकांना सहकार्य करून सत्ता उपभोगल्याचे स्पष्ट होते.अकोला जिल्हा परिषदेच्या इतिहासाचा धांडोळा घेतला तर भारिप-बमसंला कधीही एकहाती सत्ता मिळालेली नाही. प्रत्येक वेळी त्यांना कुठल्या ना कुठल्या पक्षाचा टेकू घ्यावा लागला, तर कधी अपक्षांना हाताशी घ्यावे लागले. यामध्ये भारिपाला काँग्रेस सोबत राष्टÑवादीचेही वावडे नव्हतेच. सध्याही अकोला जिल्हा परिषदेत भारिपला राष्टÑवादीचा टेकू आहेच. इतकेच नव्हे तर पुंडलिकराव अरबट यांच्या रूपाने सभापती पदही राष्टÑवादीला दिले आहे. शरद पवार जातीयवादी आहेत, तर मग त्यांचा पक्ष जिल्हा परिषेदच्या सत्तेत भारिपला कसा चालतो? या प्रश्नाचा दगड राष्टÑवादीने भारिपच्या घरावर मारला आहे. दुसरीकडे माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्यासह राष्ट्रवादीवर भारिपने आगपाखड केली आहे. गुलाबराव गावंडे हे शिवसेनेचे विदर्भातील सर्वाधिक आक्रमक नेते. थेट बाळासाहेबांचे लाडके अशी त्यांची ओळख व ख्याती होती. त्यांनीही सेनेला सोडचिठ्ठी देत राष्टÑवादी पुन्हा सेना व आता पुन्हा राष्टÑवादी अशी संगीत खुर्ची खेळली आहे. राष्टÑवादीतील अनेक नेते पक्षांतर करून आले आहेत, तर काहींची छुपी युती लपलेली नाही. अर्थात काही सन्माननीय अपवाद आहेतही; मात्र सरसकट साधन शुचिता कुठल्याच पक्षात नसल्याने राष्ट्रवादीने फेकलेले आरोपांचे दगड हे साहजिकच त्यांच्याच काचेच्या घरावर पडले आहेत.या आरोप सत्रामुळे सध्या राजकारणाचा पेंडुलम हलता आहे. जनतेचे मनोरंजन होत आहे. उद्या राष्टÑवादीला सोबत घेत काँग्रेसने आंबेडकरांची आघाडीसाठी मनधरणी करून त्यांना मनवले, तर याच नेत्यांची मोठी अडचण होणार आहे. आज एमेकांवर दगडफेक करणाºयांनाच उद्या तुझ्या गळा माझ्या गळा गुुंफू ‘मतां’च्या माळा म्हणत गळाभेट घ्यावी लागणार आहे. कारण राजकारणात कोणीच कोणाचा कायम शत्रू अन् मित्र असत नाही.

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ