सेवा हीच सत्काराची पावती - वानखडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:13 IST2021-07-09T04:13:52+5:302021-07-09T04:13:52+5:30

रोठे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती रूपालीताई गवई यांनीसुद्धा जगन्नाथ रोठे ...

Service is the acknowledgment of honor - Wankhade | सेवा हीच सत्काराची पावती - वानखडे

सेवा हीच सत्काराची पावती - वानखडे

रोठे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती रूपालीताई गवई यांनीसुद्धा जगन्नाथ रोठे यांचा सत्कार केला. रोठे यांनी त्यांच्या कार्यकाळात उत्कृष्ट सेवा प्रदान केली. वाहनाला पूर्ण सेवाकाळात अपघात झाला नाही. सेवेच्या काळात बाळापूर पंचायत समितीमध्ये अनेक लोकांची सत्ता स्थापन झाली; परंतु सत्ताधाऱ्यांसोबत कुठल्याच पद्धतीचे गैरवर्तन न करता चांगले संबंध प्रस्थापित ठेवले, रोठे यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल अनेक वेळा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभास बाळापूर पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी अरुण मुंदडा, उपसभापती धनंजय दांदळे, अनिरुद्ध देशमुख, एस.के. डोंगरे, पं.स. सदस्या अर्चना अनिरुद्ध देशमुख, नीलेश इंगळे यांच्यासह पंचायत समितीचे सदस्य व अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Service is the acknowledgment of honor - Wankhade