मोटारसायकल अपघातात एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 07:18 PM2017-10-23T19:18:07+5:302017-10-23T19:18:36+5:30

आलेगाव  :  मळसूर-आलेगाव रस्त्यावर २३ ऑक्टोबरच्या दुपारी २ वाजता मोटारसायकलचा अपघात होऊन कार्ला येथील एक  गंभीर जखमी झाला. त्याच्यावर अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

A seriously injured in a motorcycle accident | मोटारसायकल अपघातात एक गंभीर जखमी

मोटारसायकल अपघातात एक गंभीर जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देमळसूर-आलेगाव मार्गावरील घटनाजखमीला अकोला सर्वोपचार रुग्णालयात हलविले

लोकमत न्यूज नेटवर्क
आलेगाव  :  मळसूर-आलेगाव रस्त्यावर २३ ऑक्टोबरच्या दुपारी २ वाजता मोटारसायकलचा अपघात होऊन कार्ला येथील एक  गंभीर जखमी झाला. त्याच्यावर अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कार्ला येथील विकास शांताराम सोनोने हा सोमवारी दुपारी २ वाजता त्याची वहिनी शीतल नितेश सोनोने हिला एम.एच.३0 ए.यू. ९६७२ क्रमांकाच्या मोटारसायकलने तिचे माहेर असलेल्या गावंडगाव येथे घेऊन  जात असताना चरणसिंग चव्हाण यांच्या शेताजवळ मोटारसायकल रस्त्यावरून घसरून अपघात झाला. या अपघातात विकासच्या हातापायाला व तोंडाला मार लागून तो गंभीर जखमी झाला. त्याची वहिनी शीतल सोनोने हिच्या हाताला किरकोळ जखम झाली. गंभीर जखमी असलेल्या विकास सोनोने याला प्रथम आलेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. फैजल  यांनी प्रथम उपचार करून जखमीला अकोला येथे सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असून,  उपचार सुरू असल्याचे समजते.

Web Title: A seriously injured in a motorcycle accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात