पाण्याच्या कॅनमधून दारू विक्री; एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:26 IST2017-08-26T01:24:18+5:302017-08-26T01:26:04+5:30
पिण्याच्या पाण्याच्या कॅनमध्ये अवैध दारूच्या शिशा ठेवून ढाब्यावर दारूची विक्री करणार्यास बाळापूर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याच्याकडून दारूची कॅन व इतर असा १५00 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

पाण्याच्या कॅनमधून दारू विक्री; एकास अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापूर : पिण्याच्या पाण्याच्या कॅनमध्ये अवैध दारूच्या शिशा ठेवून ढाब्यावर दारूची विक्री करणार्यास बाळापूर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याच्याकडून दारूची कॅन व इतर असा १५00 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
पाण्याच्या कॅनमध्ये देशी व विदेशी दारू महामार्गावरील ढाब्यावर विक्री होत असल्याची माहिती बाळापूर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मांडवा फाटा येथील एका ढाब्यावर बनावट ग्राहक पाठविला. पाण्याच्या कॅनमधून दारू देत असताना पोलिसांनी सूरज साहेबराव उपर्वट ३२ रा. साई नगर डाबकी रोड, अकोला याला अटक केली. त्याच्याकडून दारूची कॅन व इतर साहित्य असा १५00 रुपयांचा ऐवज जप्त केला. पुढील तपास ठाणेदार एफ.सी. मिर्झा हे.काँ. शुद्धोधन इंगळे करीत आहेत.