‘शिवाजी’च्या आठ विद्यार्थ्यांंची राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेसाठी निवड
By Admin | Updated: November 2, 2015 02:52 IST2015-11-02T02:52:18+5:302015-11-02T02:52:18+5:30
विद्यापीठस्तरीय स्पर्धेत ‘शिवाजी’चे २७ विद्यार्थी चमकले, पुण्यात होणार राज्यस्तरीय स्पर्धा.

‘शिवाजी’च्या आठ विद्यार्थ्यांंची राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेसाठी निवड
अकोला - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन आविष्कार स्पर्धेत अकोल्यातील श्री शिवाजी महाविद्यालयाचे २७ विद्यार्थी चमकले. यामधील ८ विद्यार्थ्यांंची राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेसाठी निवड झाली असून, हे विद्यार्थी पुणे येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या विद्यार्थ्यांंना श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांंमधील संशोधन वृत्ती वाढावी व त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून आविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. प्रथम जिल्हा स्तरावर झालेल्या आविष्कार स्पर्धा घेण्यात आली. यामधून ४0 विद्यार्थ्यांंची निवड संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन आविष्कार स्पर्धेसाठी निवड झाली होती. यामध्ये श्री शिवाजी विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या २७ विद्यार्थ्यांंंचा समावेश असून, आकोट येथील दोन व आरडीजी महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीचा समावेश आहे. विद्यापीठस्तरीय स्पर्धा ३0 व ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात आली असून, यामध्ये शिवाजी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांंची निवड राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेसाठी झाली आहे. राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धा पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठात घेण्यात येणार असून, यामध्ये हे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. अमरावती विद्यापीठातून सर्वाधिक विद्यार्थी अकोल्यातील श्री शिवाजी महाविद्यालयाचे आहेत. त्यानंतर शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाचा एक विद्यार्थी, आरएलटी महाविद्यालयाचे दोन विद्यार्थ्यांंंचा समावेश आहे. श्री शिवाजी महाविद्यालयातील या ८ विद्यार्थ्यांंंना प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, उपप्राचार्य डाू. एस. पी. देशमुख, प्रा. पल्हाडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे मार्गदर्शन लाभले.