राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी नऊ मल्लांची निवड
By Admin | Updated: November 24, 2014 00:15 IST2014-11-24T00:15:22+5:302014-11-24T00:15:22+5:30
खामगाव येथे बुलडाणा जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा.

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी नऊ मल्लांची निवड
खामगाव (बुलडाणा) : महाराष्ट्र राज्य ३७ वी कुमार अजिंक्य पद कुस्ती स्पर्धा पुणे येथे २६ ते २८ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आज २३ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत वेगवेगळ्या वजन गटातील ९ मल्लांची राज्य पातळीवर निवड करण्यात आली आहे. निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन बुलडाणा जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष गोकुलसिंह सानंदा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कौतिकराव पवार, पंजाबराव देशमुख, पुरुषोत्तम धानुका, अशोक देशमुख, विशाल बोरसल्ले, सुरेश जाधव आदींची प्रमुख उ पस्थिती होती. या निवड चाचणी स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून एकूण ५४ मल्लांनी सहभाग घेतला. त्यापैकी ४२ किलो वजन गटात राहुल रंगनाथ कुन्नर, ४६ किलो गटात ऋषिकेश चाळगे, ५0 किलो गटात सिद्धेश्वर कुन्नर, ४६ किलो गटात ऋषिकेश चाळगे, ५0 किलो गटात सिद्धेश्वर कुन्नर, ५४ किलो गटात सचिन नरोटे, ५८ किलो गटात मयूर सुनील आडेकर, ६३ किलो गटात गजानन बुरुंगले, ६९ किलो गटात पुरुषोत्तम पाटील, तर ७६ किलो गटात अमित ठोंबरे या मल्लांनी विजय संपादन केला. २५ नोव्हेंबर रोजी पुणे येथील सह्याद्री नॅशनल स्कूल बारजे कुस्ती संकुल येथे होणार्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी रवाना होणार आहे. निरीक्षक म्हणून गणेश कोहळे, रणजितसिंह बयस, विजय बोरसल्ले, सुरेश जाधव, विजय पांडुरंग बुच आदींनी काम पाहिले.