विदेशी बनावटीचा देशी कट्टा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:22 IST2021-08-14T04:22:50+5:302021-08-14T04:22:50+5:30

अकोला: जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांद खा प्लॉट परिसरात विदेशी बनावटीचा देशी कट्टा घेऊन दहशत पसरविण्याच्या प्रयत्नात ...

Seized foreign-made katta | विदेशी बनावटीचा देशी कट्टा जप्त

विदेशी बनावटीचा देशी कट्टा जप्त

अकोला: जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांद खा प्लॉट परिसरात विदेशी बनावटीचा देशी कट्टा घेऊन दहशत पसरविण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी दुपारी अटक केली. त्यांच्याकडून एक जिवंत काडतूस व देशी कट्टा जप्त करण्यात आला आहे.

जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांद खा प्लॉट येथील रहिवासी शेख इलियास उर्फ इल्लू शेख अयाज (वय २१ वर्षे, राहणार देशपांडे प्लॉट) व शेख कासम शेख शेखजी (वय २५, राहणार चांद खा प्लॉट) हे दोघेजण सुमारे २५ हजार रुपये किमतीचा विदेशी बनावटीचा देशी कट्टा घेऊन तसेच त्यांच्याकडे एक जिवंत काडतूस असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह छापा टाकून या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विदेशी बनावटीचा देशी कट्टा व जिवंत काडतूस असा २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या दोघांविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी जुने शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, सदाशिव सुडकर, अब्दुल माजिद, संदीप तवाडे, मोहम्मद रफी, एजाज अहमद, सुशील खंडारे, सतीश गुप्ता, रोशन पटले, अनिल राठोड, प्रवीण कश्यप यांनी केली.

Web Title: Seized foreign-made katta