शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

मृत्यूच्या दारातील मुलाला पाहताच हरपली पित्याची शुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 1:41 PM

अकोला : राष्ट्रीय महामार्गामध्ये जमीन संपादनात योग्य व कायदेशीर मोबदला मिळावा, या मागणीसाठी सोमवार ५ आॅगस्ट रोजी अपर जिल्हाधिकारी ...

अकोला : राष्ट्रीय महामार्गामध्ये जमीन संपादनात योग्य व कायदेशीर मोबदला मिळावा, या मागणीसाठी सोमवार ५ आॅगस्ट रोजी अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, आशिष यांना पाहण्यासाठी रुग्णालयात आलेले वडील मदन हिवरकर यांची शुद्धच हरपली. मदन हिवरकर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आशिषची प्रकृती गंभीर असल्याने या प्रकरणाची वाच्यता झाली नव्हती; पण गुरुवारी त्यांनी सर्वोपचार रुग्णालयातून डिस्चार्ज न घेता वडिलांसाठी खासगी रुग्णालयात धाव घेतल्याने हा प्रकार उघडकीस आला.अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात सोमवारी विष प्राशन केल्यानंतर सहाही शेतकºयांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. यामध्ये कान्हेरी गवळी येथील युवा शेतकरी आशिष हिवरकर यांनीही विष प्राशन केले होते. ही माहिती मिळताच त्याच दिवशी वडील मदन हिवरकर यांनी आपल्या एकुलत्या एक लेकाला पाहण्यासाठी सर्वोपचार रुग्णालयात धाव घेतली. मरणाच्या दारात असलेल्या मुलाला या अवस्थेत पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली अन् ते बेशुद्ध झाले. वडील मदन हिवरकर यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यात आला; परंतु या ठिकाणी डॉक्टरांचा संप आणि तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने त्यांची प्रकृती गंभीर होत गेली. शेवटी त्यांना बुधवार, ७ आॅगस्ट रोजी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत. हा प्रकार आशिष यांना कळताच त्यांनी गुरुवारी सर्वोपचार रुग्णालयातून डिस्चार्ज न घेता वडिलांकडे धाव घेतली. आशिष यांच्यावरील उपचार अद्याप पूर्ण झालेला नाही; परंतु वडिलांची प्रकृती गंभीर असताना त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी कोणीच नाही. अशा परिस्थितीत दोन्ही बाप-लेकाच्या जीवास धोका निर्माण झाला असून, याकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष आहे.मदन हिवरकर यांना ‘ब्रेन हॅम्रेज’खासगी रुग्णालयात मदन हिवरकर यांच्यावर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहे. यासंदर्भात संबंधित रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधला असता, मदन हिवरकर यांना ब्रेन हॅम्रेज झाल्याचे सांगितले. त्यांच्या मेंदूच्या उजव्या बाजूने रक्तस्राव होत असून, हायपर टेन्शनमुळे हा प्रकार झाल्याचे त्यांनी सांगितले.आर्थिक परिस्थिती बेताचीहिवरकर कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बेताची असून, उपचारासाठी त्यांच्याकडे पैसा नाही. उपचारासाठी लागणारा पैसा जास्त असल्याने दोन्ही शेतकरी पिता-पुत्रावर मोठे संकट ओढवले आहे. वडिलांच्या उपचारासाठी पैसे नसल्याने हक्कासाठी लढणारा आशिष हतबल झाला आहे; परंतु प्रशासनाकडून अद्याप कुठल्याच अधिकाºयाने पाहणी केली नसल्याचे आशिष यांनी सांगितले.वडिलांची प्रकृती गंभीर असल्याने उपचार सोडून त्यांच्याजवळ आलो आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांना माहिती दिली; परंतु त्यांच्याकडून अद्याप कुठलीच मदत मिळाली नाही. कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. प्रशासनाने आतातरी हक्काचा मोबदला द्यावा.- आशिष हिवरकर, महामार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी.

 

टॅग्स :Akolaअकोलाhospitalहॉस्पिटल