बियाण्याचे गोडावून फोडले
By Admin | Updated: July 8, 2014 21:47 IST2014-07-08T21:47:49+5:302014-07-08T21:47:49+5:30
डोंगरगाव (मासा) शेतशिवारातील धोत्रे फार्ममधील गोडावून फोडून बियाण्यांसह ३ लाखांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास

बियाण्याचे गोडावून फोडले
डोंगरगाव मासा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील डोंगरगाव (मासा) शेतशिवारातील धोत्रे फार्ममधील गोडावून फोडून बियाण्यांसह ३ लाखांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रविवार, ६ जुलैच्या मध्यरात्री घडली. राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ६ वर डोंगरगाव (मासा) शिवारात धोत्रे फार्म आहे. डोंगरगावला लागूनच असलेल्या बोंदरखेड सिसा येथील संदीप बाळकृष्ण साबळे हे गत १२ वर्षांपासून हे शेत वाहत आहेत. त्यांनी या शेतात असलेल्या गोडावूनमध्ये बी-बियाणे, खते, तसेच इतर शेतमाल ठेवला होता. जिल्हाभरात ह्यबाईकर गँगह्णची चर्चा सुरू असल्यामुळे भीतीपोटी त्यांनी या गोडावूनमध्ये रात्रीच्या वेळी थांबण्याचे टाळले. अज्ञात चोरट्यांनी ती बाब हेरली आणि संधीचा फायदा घेत रविवार, ६ जुलैच्या रात्री गोडावूनमधील अंदाजे १ लाख २५ हजार रुपये किमतीचे ४0 क्विंटल सोयाबीन बियाणे, ५0 हजार रुपये किमतीच्या डीएपी खताच्या ४५ बॅग, १२ हजार रुपये किमतीचे तूर बियाणे, ५0 हजार रुपये किमतीच्या गहू बियाण्यांसह अंदाजे ३ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही बाब सोमवारी सकाळी संदीप साबळे यांना दिसली. या प्रकरणी तक्रार देण्यात आल्यानंतर बोरगाव मंजू पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला.