महापारेषण अभियंत्याच्या जाचाला कंटाळून सुरक्षा रक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 10:28 AM2020-06-23T10:28:35+5:302020-06-23T10:36:28+5:30

र्यकारी अभियंता गणेश देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून हा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पोलीस तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.

Security guard attempts suicide after getting fed up with Engineer's harassment | महापारेषण अभियंत्याच्या जाचाला कंटाळून सुरक्षा रक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

महापारेषण अभियंत्याच्या जाचाला कंटाळून सुरक्षा रक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देमानसिक त्रासाला कंटाळून कार्यालयातील सॅनिटायझरची एक बॉटल प्राशन केली. सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.


लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गोरक्षण रोडवरील महापारेषणच्या कार्यालयातील एका सुरक्षा रक्षकाने कार्यकारी अभियंत्याच्या जाचाला कंटाळून सोमवारी सॅनिटायझर प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सुरक्षा रक्षकाला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसानी सोमवारी रात्री उशिरा चौकशीस प्रारंभ करीत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
धीरज खंडारे हे काही वर्षांपासून महापारेषणमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला आहेत. धीरज खंडारे यांनी सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी ते कर्तव्यावर असताना कार्यकारी अभियंता गणेश देशमुख यांच्या कर्मचाऱ्याने त्यांना केबिनमध्ये बोलावले. यावेळी अभियंता गणेश देशमुख यांनी तुझ्या नातेवाइकाचे निधन झाले, त्यामुळे तू सुद्धा १४ दिवस कर्तव्यावर येऊ नकोस, असे सुरक्षा रक्षक खंडारे यांना म्हटले. त्यानंतर खंडारे यांनी उत्तर देत नातेवाइकाचे निधन झाले असले तरी आम्ही कुणीही तिकडे गेलो नव्हतो. त्यामुळे १४ दिवस घरी जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे स्पष्ट केले. तरीही सुरक्षा म्हणून मी वैद्यकीय तपासणी करून येतो, असे म्हटल्यानंतर कार्यकारी अभियंता यांनी धीरज खंडारे यांना शिवीगाळ केली. त्यामुळे मानसिक दडपणात आलेल्या धीरज खंडारे यांनी देशमुख यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून कार्यालयातील सॅनिटायझरची एक बॉटल प्राशन केली. त्यामुळे धीरज खंडारे यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
उपचारादरम्यान धीरज खंडारे यांनी आपण कार्यकारी अभियंता गणेश देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून हा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पोलीस तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली. त्यानंतर महापारेषण कार्यालयाच्या परिसरात एकच खळबळ उडाली. आता वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात काय चौकशी करतात, याकडे लक्ष लागले असून,ा तपासानंतर पोलिस गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Web Title: Security guard attempts suicide after getting fed up with Engineer's harassment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.