भाजप नेत्यांची सुरक्षा रद्द, अकाेल्यात निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:45 IST2021-01-13T04:45:10+5:302021-01-13T04:45:10+5:30

किराणा साहित्याच्या दरामध्ये वाढ अकाेला : गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाचे दर सातत्याने वधारण्यासोबतच अन्य स्वरूपातील किराणा साहित्याच्या दरातही ...

Security of BJP leaders canceled, protests in Akala | भाजप नेत्यांची सुरक्षा रद्द, अकाेल्यात निषेध

भाजप नेत्यांची सुरक्षा रद्द, अकाेल्यात निषेध

किराणा साहित्याच्या दरामध्ये वाढ

अकाेला : गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाचे दर सातत्याने वधारण्यासोबतच अन्य स्वरूपातील किराणा साहित्याच्या दरातही वाढ झाल्याचे दिसत आहे. यामुळे गृहिणींचे मासिक बजेट बिघडल्याचा सूर उमटत आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळविण्याची मागणी होत आहे.

भाजप कार्यालय सचिवपदी काळे

अकाेला : माजी नगरसेवक हरिभाऊ काळे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना कार्यालय सचिव महानगर भाजपा ही जबाबदारी देण्यात आली आहे. नगर भाजपा अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी ही नियुक्ती केली असून, नियुक्तीचे पत्र आमदार गोवर्धन शर्मा यांच्या शुभहस्ते भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, तेजराव थोरात यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी महापौर अर्चनाताई मसने, चंदाताई शर्मा, अश्विनीताई हातवळणे, गिरीश जोशी, संजय जिरापुरे, जयंत मसने, धनंजय धबाले, डॉ. विनोद बोर्डे, संजय गोंडा, अमोल गोगे, उमेश गुजर, राजेंद्र गिरी, सतीश ढगे, योगीता पावसाळे आदी उपस्थित होते.

Web Title: Security of BJP leaders canceled, protests in Akala