कारंजात थंडीचा दुसरा बळी

By Admin | Updated: December 29, 2015 02:04 IST2015-12-29T02:04:53+5:302015-12-29T02:04:53+5:30

मृतक अकोला जिल्ह्यातील रहिवासी.

The second victim of cold weather | कारंजात थंडीचा दुसरा बळी

कारंजात थंडीचा दुसरा बळी

कारंजा लाड (जि. वाशिम): पश्‍चिम वर्‍हाडात थंडीचा कहर सुरू असून कारंजा शहरात अशोक रामराव शिंदे या इसमाचा थंडीमुळे सोमवारी मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतक वेडसर असून अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील खांदला येथील रहिवाशी आहे. तालुक्यातील बेंबळा येथील हरिदास वानखडे या इसमाचा २६ डिसेंबर रोजी थंडीने कामरगाव येथे मृत्यू झाला होता. थंडीमुळे मृत्यू झाल्याची तालुक्यातील ही दुसरी घटना आहे.

Web Title: The second victim of cold weather