शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मृग नक्षत्राचा दुसरा दिवसही कोरडा; पुढील दोन दिवसात पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 18:12 IST

मृग नक्षत्राचा दुसरा दिवसही कोरडा गेला आहे.

अकोला : यावर्षी चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे; परंतु मृग नक्षत्राचा दुसरा दिवसही कोरडा गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, १० जून रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.रविवारी नैर्ऋत्य मान्सून थोडा पुढे सरकला असून, कर्नाटकचा बराचसा अंतर्गत भाग, तामिळनाडू पाँडेचेरी, हसन, सेलम, कराईकलसिमोगा चित्तुर चेन्नई आदी भाग त्याने व्यापलेला आहे. मान्सून आणखी पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. आता तो कोकण गोवा, कर्नाटकचा आणखी काही भाग, संपूर्ण तामिळनाडू, रायलसीमा आणि किनारी आंध्र प्रदेश, मध्यवर्ती बंगालचा उपसागर आणि ईशान्य भारताचा काही भागात पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. लवकरच तो कोकणमधून पुढे सरकून दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे.दरम्यान, पूर्व बंगालच्या उपसागरात ५.८ किमी उंचावर चक्राकार वारे वाहत असून, याच प्रभावाने पुढील २४ तासात एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. याची तीव्रता वाढून १० जून रोजी ठळक कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. या कमी दाब क्षेत्राचा प्रवास पश्चिम-उत्तर दिशेने होण्याची शक्यता आहे.सध्या गुजरात वर ३.५ किमी उंचीवर आणि केरळ किणारपट्टीवर ५.८ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ९ जून रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. १० जून रोजी विदर्भात विखुरलेला स्वरूपात काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून, पश्चिम विदर्भात पावसाचे प्रमाण कमी राहील. ११ जून रोजी विदर्भात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाweatherहवामानRainपाऊस