चोरी गेलेल्या गाईचा चार तासात शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:23 IST2021-07-07T04:23:20+5:302021-07-07T04:23:20+5:30

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवर येथील ढोने कॉलनीमधील राहवासी बन्सी श्रीनारायण तिवारी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी ...

Search for a stolen cow in four hours | चोरी गेलेल्या गाईचा चार तासात शोध

चोरी गेलेल्या गाईचा चार तासात शोध

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवर येथील ढोने कॉलनीमधील राहवासी बन्सी श्रीनारायण तिवारी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी रात्रीच्या वेळी त्यांच्या राहत्या घराच्या बाहेर चार गायी बांधल्या होत्या. पैकी एक गाय मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरल्याची तक्रार तिवारी यांनी शनिवारी सकाळी दिली. एमआयडीसी पोलिसांनी तपास करीत असतानाच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून चोरीस गेलेली गाय आरोपी शिवर येथे राहणारा अक्षय भास्कर कोल्हे (वय २६) रा. नांदुरा जिल्हा बुलडाणाकडून पीकेव्हीच्या परिसरातून घेऊन जात असताना ताब्यात घेतली. हा तपास एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या चार तासात करून तिवारी यांना त्यांची गाय परत केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर यांनी केली.

Web Title: Search for a stolen cow in four hours