अपहृत मनश्रीची शोधमोहीम सुरूच

By Admin | Updated: June 27, 2016 02:34 IST2016-06-27T02:34:50+5:302016-06-27T02:34:50+5:30

पोलिसांनी तपासले सीसीटीव्ही फुटेज.

The search for the kidnapped Manashree continued | अपहृत मनश्रीची शोधमोहीम सुरूच

अपहृत मनश्रीची शोधमोहीम सुरूच

आकोट (जि. अकोला): स्थानिक जिजामाता नगरातील अपहरण करण्यात आलेल्या मनश्रीची शोधमोहीम सुरूच आहे. तिचा शोध घेण्यात पोलीस यंत्रणेला अद्यापही यश आलेले नाही. २५ रोजी तपासाच्या दृष्टीने हिवरखेड येथील दुकानातील सीसी टीव्हीचे फुटेज २५ जून रोजी पोलिसांनी तपासले; परंतु काही निष्पन्न होऊ शकले नाही. मनश्रीचा शोध घेण्याकरिता पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. सीतला माता मंदिरात सवंगड्यांसेबत खेळताना संतोष लाकडे यांच्या साडेपाच वर्षीय मनश्री या बालिकेचे एका अज्ञात महिलेने चॉकलेट देण्याचे आमिष देऊन २४ जून रोजी अपहरण केले. मनश्री सोबत खेळत असलेल्या सवंगड्यांनी सदर महिलेचे वर्णन पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी व नातेवाइकांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. सोशल साईटवरदेखील तिचा फोटो व वर्णन व्हायरल करण्यात आले, तसेच पोलिसांनी नाकाबंदीही केली; पण पोलिसांना तिचा थांगपत्ता लागला नाही.

Web Title: The search for the kidnapped Manashree continued