पाच दुकानांना लावले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:15 IST2021-06-01T04:15:06+5:302021-06-01T04:15:06+5:30

मनपात अहिल्यादेवी यांना अभिवादन अकाेला : मनपाच्या मुख्‍य सभागृहात अहिल्‍यादेवी होळकर यांच्‍या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्‍ये माजी महापौर सुमन गावंडे ...

Sealed five shops | पाच दुकानांना लावले सील

पाच दुकानांना लावले सील

मनपात अहिल्यादेवी यांना अभिवादन

अकाेला : मनपाच्या मुख्‍य सभागृहात अहिल्‍यादेवी होळकर यांच्‍या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्‍ये माजी महापौर सुमन गावंडे यांच्‍या हस्‍ते अहिल्‍यादेवी होळकर यांच्‍या प्रतिमेचे पूजन करून माल्‍यार्पण करण्‍यात आले. या वेळी नगरसचिव अनिल बिडवे, विद्युत विभागाचे अमोल डोईफोडे, वरिष्‍ठ आरोग्‍य निरीक्षक संजय खोशे, राजेश कोंडाणे, संजय चव्‍हाण, राजेंद्र सोनाग्र, विवेक मुंगी, किशोर सोनटक्‍के, नीलम खत्री, पंकज देवळे, पूर्णाजी पाटील, पुरुषोत्तम इंगळे, गणेश बुंदेले, विश्‍वनाथ सुतवणे, लता चोरपघार आदींची उपस्थिती होती.

शहरात ५५ जण काेराेनाबाधित

अकाेला : मागील काही दिवसांपासून महापालिका क्षेत्रात काेराेनाबाधित रुग्णांची संख्या कमी हाेत चालली आहे. साेमवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त अहवालानुसार शहरातील ५५ जणांना काेराेनाची लागण झाली आहे़ यामध्ये पूर्व झाेनमध्ये १८, पश्चिम झाेन ८, उत्तर झाेन ८ व दक्षिण झाेनमध्ये काेराेनाचे २१ रुग्ण आढळून आले आहेत़

१७४१ जणांनी केली काेराेना चाचणी

अकाेला : शहराच्या विविध भागांत काेराेनाचा प्रादुर्भाव झाला आहे़ मागील काही दिवसांपासून काेराेनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, काेराेनाची लक्षणे आढळून येणाऱ्या सुमारे १७४१ जणांनी साेमवारी चाचणी केली़ यामध्ये १८५ जणांनी आरटीपीसीआर व १५५६ जणांनी रॅपिड अँटिजन चाचणी केली़ संबंधितांचे अहवाल चाचणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत.

Web Title: Sealed five shops