पातूर तालुक्यात ‘एसडीओं’नी घेतला लसीकरणाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:17 IST2021-05-15T04:17:23+5:302021-05-15T04:17:23+5:30
बाळापूरचे उपविभागीय अधिकारी विश्वनाथ घुगे यांनी विवरा येथे भेट देऊन लसीकरणाबाबत आढावा घेतला. सोबतच पातूर येथील कोविड-१९ रुग्णालयाची पाहणी ...

पातूर तालुक्यात ‘एसडीओं’नी घेतला लसीकरणाचा आढावा
बाळापूरचे उपविभागीय अधिकारी विश्वनाथ घुगे यांनी विवरा येथे भेट देऊन लसीकरणाबाबत आढावा घेतला. सोबतच पातूर येथील कोविड-१९ रुग्णालयाची पाहणी केली. चरणगाव येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली, तसेच आलेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन ग्रामपंचायत कार्यालयात सभा घेतली. त्यानंतर चोंढी येथे कोरोनाबाधित रुग्णांना विलगीकरणाची सोय नसल्याने त्यांना गावातील जिल्हा परिषद शाळेत विलगीकरणाची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. तालुक्यातील नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे, फिजिकल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर करावा, लग्न समारंभ परवानगी घेऊन साधेपणाने करावा, याबाबत सूचना दिल्या. त्यांच्यासोबत पातूरचे तहसीलदार दीपक बाजड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जाधव, गटविकास अधिकारी अनंत लव्हाळे, मंडळ अधिकारी व्ही.बी. राठोड, तलाठी आदी उपस्थित होते.
--------------
कोविड टेस्टिंग वाढवा!
सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, नागरिकांनी कोरोनाची तपासणी करून घ्यावी, तसेच कोरोनाचे लक्षणे असल्यास तात्काळ आरोग्य केंद्रावर जाऊन तपासणी करावी, तसेच नागरिकांना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन उपविभगाीय अधिकारी घुगे यांनी केले, तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनीही कोविड चाचणीचा वेग वाढविण्याच्या सूचना केल्या.